*भारत नेट आणि महानेटमुळे ग्रामपंचायतीला ताप*
*जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये दोन वर्षांपासून नेट गायब*
*तात्काळ पर्यायी व्यवस्था उभी करण्याची आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी*
चंद्रपूर : नागरिकांना डिजिटल कागदपत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना आखल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात या योजनांमुळे ग्रामीण नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे चित्र आहे. भारत नेट व महानेट यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत येथे नेट सुविधा पुरविण्यात येते. परंतु मागील दोन वर्षांपासून नेटवर्क नसल्यामुळे या दोन्ही कंपनीचे लावलेले ऑप्टिकल फायबर नेटवर्क शोभेची वस्तू बनली आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सोईसाठी तात्काळ पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
ग्रामीण भागात ग्रामपंचायत मध्ये अनेक नोंदी करावी लागतात. कामकाज अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने डिजिटल पद्धतीने हा कारभार पार पडत असतो. परंतु जिल्ह्यात परिस्थिती वेगळी आहे. भारत नेट व महानेट चे ऑप्टिकल फायबर नेटवर्क ग्राम पंचायत मध्ये लावण्यात आले. मागील दोन वर्षांपासून यावर नेटवर्क येत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु यावर कोणतेच पाऊले उचले नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महत्वाचं म्हणून ग्रामीण भागात पथदिवे लावण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये निधी नसल्याने अनेक गावे अंधारात जातात. या नेटवर्क चे ऑप्टिकल फायबर नेटवर्क यंत्राला लागणार वीज पुरवठा देखील ग्रामपंचातीमधून होतो. त्याचे वीज बिल देखील ग्रामपंचायतीलाच द्यावे लागते. आधीच नेटवर्क नाही आणि वीजबिल हे दोन्ही ताण ग्रामपंचायतीवर येत आहे. त्यामुळे तात्काळ पर्यायी व्यवस्था उभी करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment