विमा प्रतिनिधीचे एल आय. सी कार्यालयासमोर देशव्यापी असहकार आंदोलन,
वरोरा न्यूज नेटवर्क
वरोरा, लाईफ इन्शुरन्स एजंट्स असोसिएशन वरोरा शाखेचे वतीने विमा एजंट व विमा ग्राहक यांच्या मागण्या मान्य करण्यात यावे यासाठी 5सप्टेंबर रोजी शाखेसमोर देशव्यापी असहकार आंदोलन करण्यात आले. यावेळी देशातील अकरा लाख एलआयसी एजंट या असहकार आंदोलनात सामील झाले होते. एक सप्टेंबर पासून पुढील 30 तारखेपर्यंत हा असहकार आंदोलन सुरू असणार आहे. ग्राहक आणि एलआयसी एजंट यांना यांच्या रास्त मागण्या या निवेदनात केल्या गेल्या आहेत.
विमा पॉलिसी वरील बोनस वाढविणे बाबत, कर्जावरील व्याजदर कमी करण्यात यावे. विमा एंजटाला सन्मान पुर्वक वागणूक मिळण्यात यावे, विमा पॉलिसी वर जीएसटी बंद करण्यात यावे, विमा अभिकर्ता यांचे ग़्रंच्युटी मध्ये वाढ करण्यात यावे.
अशा विविध मागणी साठी शाखेसमोर देशव्यापी असहकार आंदोलन करण्यात आले. यावेळी विमा अभिकर्ता यांनी सर्व प्रकारचे कामकाज बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी विमा अभिकर्ता यांचे कडून जोरदार नारे बाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात दोनशेहून अधिक अभिकर्ता सहभागी झाले होते. यावेळी अध्यक्ष ईश्वर डुकरे, सचिव निलेश मानकर, कोषाध्यक्ष काशिनाथ शेंडे, व वरोरा शाखेचे सर्व विमा अभिकर्ता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment