केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात**केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

*केंद्रीय योजना सर्व स्तरावर राबवाव्यात*

*केंद्रीय मंत्र्यासोबत संवाद साधताना केली मागणी*

वरोडा : श्याम ठेंगडी 

           केंद्राच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत शहरी, ग्रामीण व जिल्हास्तरीय असा भेदभाव न करता या योजना सर्वसामान्यांसाठी सर्वच स्तरांवर राबविल्या जाव्यात मात्र प्रत्येक जिल्ह्यात या योजना राबवताना पक्षातील एखाद्या ज्येष्ठ तज्ञ नागरिकाची या योजनात नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी येथील राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या व सावित्रीबाई फुले महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णरेखाताई पाटील यांनी केंद्रीय पेट्रोलियम आवास व शहरी विकास मंत्री  हरदिपसिंग  पुरी यांचेकडे केली.
         चंद्रपूर येथील एनडी हॉटेल येथे आयोजित  जनसंघाच्या काळातील जेष्ठ कार्यकर्त्यांशी मंत्री महोदय संवाद साधत होते.त्यावेळी सुवर्णरेखाताई पाटील यांनी ही मागणी केली.
      केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी खर्चिक आजारासाठी आयुष्यमान भारत योजनेच्या धर्तीवर एखादी आरोग्य सेवा योजना आखावी. मात्र ही योजना सर्व स्तरावर ,सर्व प्रवर्गासाठी असावी अशी मागणी त्यांनी केली . 
     तसेच जनसंघाच्या ज्या कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर भाजप आज जगात सर्वात मोठी सदस्य संख्या असलेला पक्ष बनला व एक मजबूत राजकीय शक्ती म्हणून उदयास आलेला आहे. त्या जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे पक्षाने दुर्लक्ष न करता त्यांना पक्षात मानाचे स्थान द्यावे अशीही मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली.
         जे मंदिर किंवा इतर धर्मीय प्रार्थना स्थळातील प्रशासन तेथील पुजाऱ्यांच्या पुनर्जीवनाची सोय करू शकत नाही.  तेथील पुजाऱ्यांसाठी केंद्र शासनाने एखादी लाभदायी योजना आखावी अशी मागणी ही त्यांनी यावेळी बोलताना केली

Comments