तालुक्यातील माजरी येथील घटना.
भद्रावती.
जन्मदात्या बापानेच आपल्या पोटच्या मुलीवर लैंगीक अत्याचार केला.हि मानवीय नात्याला काळीमा फासणारी घटना तालूक्यातील माजरी येथे घडली.या प्रकाराची तक्रार माजरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असुन माजरी पोलिस ठाण्यात या नराधम बापावर पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी बापास अटक करण्यात आली आहे. माजरी येथील या आरोपिने आपल्या सख्या मुलिवर लैंगीक अत्याचार करुन बापलेकिच्या पवित्र नात्याला काळीमा फासला आहे.या घटनेनंतर या प्रकाराची तक्रार माजरी पोलिसात करण्यात आली. सदर आरोपिवर संबंधीत गुन्हे दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी वरोरा यांच्या मार्गदर्शनात माजरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे या करीत आहे.या घटनेसंदर्भात परिसरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment