घोडपेठच्या कर्मिविर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
भद्रावती
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील कर्मवीर शाळेत शिकणाऱ्या जवळपास अंशी विद्यार्थ्यांना बसच्या चुकिच्या वेळापत्रकामुळे शिक्षण अर्धवट सोडून एक तास आधिच शाळा सोडावी लागते तर शाळेत जाण्यासाठी जवळपास अडिच तास आधिच घरुन शाळेसाठी निघावे लागते त्यामुळे त्यांच्या शिक्षणासोबतच त्यांचा वेळही व्यर्थ जात असल्याने भद्रावती कचराळा या बसचे वेळापत्रक बदलवुन ते विद्यार्थ्यांच्या सोईनुसार करावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे. घोडपेठ येथील कर्मवीर शाळेत इयत्ता पाच ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असल्यामुळे परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.कचराळा,चपराळा यागावातील जवळपास अंशी विद्यार्थी बसने शाळेत येतात.शाळा सकाळी साडेअकराला सुरु होते मात्र ही बस कचराळ्याहून सकाळी साडेनवुला सुटत असल्याने विद्यार्थ्यांना सकाळीच घरुन शाळेसाठी निघावे लागते. तर ही बस शाळेजवळील बसस्थानकावर दुपारी सव्वा चारला ही बस कचराळ्याला जाण्यासाठी येते व दुसरी बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा एक तास आधिच सोडून बस पकडावी लागत असल्याने त्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक नरेश साळवे व इतर शिक्षक मिळून हे सर्व दररोज शाळा सुटण्याच्या एक तास आधी या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे जवळच्या बस स्टॉप वर पोहोचवून आपली जबाबदारी पार पाडत असतात .हि गंभीर बाब लक्षात घेऊन ही बस कचराळा गावातून सकाळी दहा वाजता सोडावी व परत येत असतांना ती शाळेजवळ साडेपाच वाजता येईल अशी व्यवस्था करुन या विद्यार्थ्यांना सुविधा द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे.
Comments
Post a Comment