प्रियदर्शिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये (आय. टी. आय.) श्री. विश्वकर्मा जयंती व दिक्षांत समारंभ साजरा

प्रियदर्शिनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थमध्ये (आय. टी. आय.) श्री. विश्वकर्मा जयंती व दिक्षांत समारंभ साजरा

भद्रावती येथील प्रियदर्शिनी खाजगी औ. प्र. संस्था, भद्रावती येथे दिनांक १७/०९/२०२२ रोजी मोठया उत्साहात श्री विश्वकर्मा जयंती व दिक्षांत समारंभ साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी श्री. संजय आसेकर, प्राध्यापक, कर्मविर कनिष्ठ विद्यालय, भद्रावती आणि प्रमुख पाहुणे संस्थेचे प्राचार्य प्रविण बालसराफ हे होते.

१७ सप्टेंबर श्री. श्री. विश्वकर्मा यांची जयंती व स्वातंत्राचे ७५ वे वर्ष 'आझादी का अमृत महोत्सव' च्या निमित्याने डीजीटी, नवी दिल्ली, भारत सरकार याच्या सुचने नुसार ऑगस्ट २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यासाठी पदविदान समारंभ आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश १) राष्ट्र निर्माण उपक्रमाचा भाग असल्याबद्दल प्रशिक्षणार्थी मध्ये अभिमान आणि सन्मानाची भावना निर्माण करणे. २) भारत सरकारच्या महासंचालनालयाने हाती घेतलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय कार्यक्रमाशी संबंधित बंधुत्वाची भावना अंतर्भूत करणे. ३) उद्योगातील आय. टी. आय. ची ब्रँड प्रतिमा आणि प्रशिक्षणार्थीचा समुदाय मजबुत करणे. ४) प्रत्येक आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण साजरे करने आणि आय. टी. आय. सह विद्यार्थ्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण करा.

जुलै २०२२ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षांच्या निकालात सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असुन विजतंत्री या व्यवसायातील प्रथम कु. आरती घोलु तेजावत ८८.८३% गुण, द्वितिय महेश घोलु तेजावत ८८. १६% गुण व तृतीय प्रज्वल सुखदेव मत्ते ८४. ८३% गुण, यांत्रिकी डिझल या व्यवसायातील प्रथम ईश्वर मधुकर पारशिवे ८६. ६६% गुण, द्वितिय तुषार रविद्र लांडे ८६.१६% गुण व तृतीय मोहम्मद जुनेद शेख ८४.१६ % गुण तसेच जोडारी या व्यवसायातील प्रथम राहुल दिलीप दास ८३.६६ % गुण, द्वितिय सौरब सुजित बाला ८२ % गुण व गौरव विठ्ठल माहुरे ७५.५०% गुण घेवून असे प्राविण्य प्राप्त केले. या संस्थेतील यांत्रिकी डिझल या व्यवसायाचे सर्वच प्रशिक्षणार्थी, विजतंत्री या व्यवसायातील १९ पैकी १८ प्रशिक्षणार्थी आणि जोडारी या व्यवसायातील ११ पैकी १० उत्तीर्ण झालेले आहे अशाप्रकारे संस्थेचा निकाल ९६% इतका लागलेला आहे. सदर प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संचालक श्री. धनंजय गुंडावार, प्राचार्य श्री. प्रविण बालसराफ, निदेशक श्री. काकडे सर, श्री. सय्यद सर, कु. मेघा डोये मॅडम, कु. आशा राम मॅडम यांना देतात. संचालन कु. मेघा डोये यांनी केले तर आयोजनासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे समारोप श्री. काकडे सर यांनी केली.

Comments