वरोरा न.प. च्या कंत्राटी सफाई कामगारांची वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याची मागणी.

वरोरा न.प. च्या कंत्राटी सफाई कामगारांची वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याची मागणी.

कोरोना योद्धा म्हणून ओळख असलेले सफाई कामगार आज दुर्लक्षित.

किमान वेतन मिळवण्यासाठी सफाई कामगारांचे आंदोलन 

वरोरा 2/8/22
चेतन लूतडे 

वरोरा नगरपालिका हद्दीत असलेले कंत्राटदार केजीएन कॅटर्स अँड ट्रॅव्हल्स गेल्या चार वर्षापासून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडीचे कचरा गोळा करण्याचे काम करीत आहे.  या कामावरती कंत्राटी पद्धतीने बऱ्याच वर्षापासून सफाई कर्मचारी काम करत असून वारंवार यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची मागणी मुख्याधिकारी वरोरा यांच्याकडे करण्यात आली आहे.

सफाई कर्मचारी कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून ओळखले जात होते. मात्र तेच योध्दे आता दुर्लक्षित झाले आहे. किमान वेतन अधिनियमानुसार सफाई कामगारांचे वेतन अदा करण्याची व हप्त्यातून एक सुट्टी देण्याची मागणी मुख्याधिकारी गजानन भोयर यांच्याकडे करण्यात आली आहे. 
कंत्राटदार सध्या मनमानी पद्धतीने वेतन देत असून वेतन वाढ मागणाऱ्या कर्मचाऱ्याची हकलपट्टी करण्यात येत असल्याची खंत सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी बऱ्याच सफाई कामगारांचे पीएफ सुद्धा भरण्यात येत नसून कंत्राटदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी पालिका तर्फे दबाव तंत्राचा वापर करण्यात येत असल्याची खंत सुद्धा सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

त्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या मागणीकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन तात्काळ न्याय देण्याची मागणी सफाई कामगारांनी केली आहे.

Comments