प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजुरकर परिवारास सदिच्छा भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजुरकर परिवारास सदिच्छा भेट

वरोरा 19/9/22
चेतन लूतडे 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी वरोरा येथे  मनसे चे रमेश राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.

वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश राजूरकर हे आगामी निवडणुकीदरम्यान मनसे तर्फे विधानसभा क्षेत्रात प्रभावी नेतृत्व ठरणार असून मनसे सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन वार्तालाप केली. यावेळी मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही भेट दिल्याने मनसेची दावेदारी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्की मानली जात आहे. यावेळी राजूरकर परिवारांची विचारपूस करीत असताना पायाच्या ऑपरेशन अभावी चालणे जड झाल्याची खंत व्यक्त केली.
रमेश राजूरकर यांनी मागील विधानसभा पेक्षा यावेळेस नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन   राज ठाकरे यांना दिले. यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते

यानंतर चंद्रपूर येथील दौऱ्यासाठी ते रवाना झाले जातानी मात्र मनसे सैनिकासाठी गाडीतून हात बाहेर करून आभार व्यक्त केल्याने मनसे सैनिकात नवचैतन्य निर्माण झाले .

Comments