भद्रावती येथील ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा परिसर ताडोबा जंगलाला लागून असल्याने येथे नेहमीच वन्य प्राण्यांचा वावर असतो आणि अनेकवेळा या वन्य प्राण्यांना लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद करून डोळ्यांनी पाहिले आहे. हा प्रकार भद्रावती येथील साई नगर येथील मिहीर चक्रवर्ती यांच्या घरात कोंबडीच्या पिंजऱ्यातील कोंबडी खायला आल्याने 2 ते अडीच वर्षे वयाचा बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. मिहीर चक्रवर्ती या परिसरात राहत असताना शेजारी जंगल असल्याने त्यामुळे जंगली प्राण्यांच्या नेहमी संचार असतो.
काल रात्री त्यांच्या घरात 2 ते अडीच वर्षाचे बिबट कोंबडी ठेवलेले पाहून तो पिंजऱ्याजवळ पोहोचला आणि आपल्या प्रयत्नानंतर त्याने पिंजराच्या आत प्रवेश केला. तो तिथे असलेल्या तीन कोंबड्यांच्या बिबट्याने आपला चारा बनवला .
मिहीरच्या म्हणण्यानुसार पिंजऱ्यात पाच ते सहा कोंबड्या होत्या, त्या कोंबड्यांपैकी तीन मोठ्या कडकनाथ जातीचे होत्या.त्यामुळे मिहीर चक्रवर्ती यांचे 10 ते 12000 रु. चे नुकसान झाले.यादरम्यान वन विभागाने आपला पिंजरा लावून बिबट्याला रेस्क्यू करण्यात आले वैद्यकीय परीक्षणानंतर बिबट्याला निसर्ग मुक्त करण्यात आले. रेस्क्यू करता वेळी भद्रावतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे, प्रशांत खाडे वन विभाग प्रमुख चंद्रपूर, चौरे मॅडम, इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोत्रे, सदस्य संदीप जीवने व वरोराचे एनजीओ विशाल मोरे, प्रशांत रावत आणि सारद एनजीओ चंद्रपूरचे अनुप येरणे, इमरान खान, अमोल कुचेकर, सोनू कुचेकर आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment