रोटरी क्लब वरोरा " घेऊन येत आहे संगीतप्रेमीं साठी अभिनव कार्यक्रम*

*रोटरी क्लब वरोरा " घेऊन येत आहे संगीतप्रेमीं साठी अभिनव कार्यक्रम* 

वरोडा : श्याम ठेंगडी
           सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणार्‍या येथील रोटरी क्लबच्या वतीने संगीतप्रेमीसाठी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
      *"रोटरी सा रे ग म प " प्रवास सप्तसुरांचा........*
हा कार्यक्रम आयोजित केला असून यात रोटरी क्लबकडून
चंद्रपूर ,वर्धा,यवतमाळ जिल्ह्यातून वय वर्ष 12 ते 40 च्या वयोगटातून इच्छुक स्पर्धकांसाठी ऑडिशन राउंड घेतल्या जाणार आहे. यातून संगीततज्ञ परीक्षकांमार्फत 20 प्रतिभावान कलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. 
        निवडण्यात आलेले स्पर्धकांना  अंतिम फेरीत एका सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या कला सादर करण्याची संधी दिल्या जाईल व त्यातून पाच विजेत्यांची निवड केल्या जाईल.या विजेत्यांना अनुक्रमे 11000/-,7000/-,5000/- व 1000 रूपयांचे 2 अशी पारितोषिक आणि सम्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. 
     रोटरी क्लब वरोरावासीयां साठी आणलेल्या या संगीत मेजवानीला वरोरावासियांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद व सहकार्याचे आवाहन करत इच्छूक स्पर्धाकांनी ऋग्वेद बेदरकर-8446550534,
आनंद बेदरकर -9860013294,
योगेश डोंगरवार-9860464801, 
अलीहुसैन सद्दीकोट-9975525262,
अभिजीत बोथले-9860247622 व 
नुतन जुनघरे-99561713193 
यांचेशी संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.

https://instagram.com/lutadechetan?igshid=YmMyMTA2M2Y=

Comments