.......................................
भद्रावती:- स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात आजादी का अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या अभीयानाअर्तगत जागृतीपर दिनांक 12 ऑगस्ट 2022 ला प्रभात फेरी काढण्यात आली
प्रभात फेरीला संबोधित करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सांगितले की देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी दिलेला लढा व बलिदान तसेच देशांच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये युवकांचे योगदान व त्यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या या विषयाचे विस्तृत प्रमाणात मार्गदर्शन केले
महाराष्ट्र पोलीस शाखा वरोरा च्या वतीने भद्रावती मध्ये आगमन केलेल्या बाईक रॅलीचे महाविद्यालयातर्फे स्वागत व अभिवादन करण्यात आले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी महाविद्यालयापासून ते नाग मंदिर पर्यंत हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत व दिनांक 13 ,14 व 15 ऑगस्ट रोजी सर्वांनी हर घर तिरंगा या जनजागृती अभियानांतर्गत सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यात आली
या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते
Comments
Post a Comment