अभाविप भद्रावती तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिरांगा ध्वज वाटप.

अभाविप भद्रावती तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त तिरांगा ध्वज वाटप.

     आपल्या देशाला या स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्य मिळवून ७५ होणार पुर्ण होत आहे त्या निमित्त १५ ऑगस्ट २०२१ पासून 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' देश भरात उतसाहात साजरा करत आहे. या निमित्त घरो घरी तिरंगा लावला पाहिजे म्हणून व सर्व नागरीक उत्साहाने सहभागी झाले पाहिजे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे विद्यार्थ्यांना, नागरिकांना व व्यापाऱ्यांना तिरंगा ध्वज निःशुल्क वाटण्यात आले. भद्रावती येथील विवेकानंद महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांन सोबत मिळून विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वज दिले व लोकमान्य विद्यालय, निळकंठराव शिंदे कला व विज्ञान महाविद्यालय, भद्रावती व्यापारी संघटनेच्या सदस्यांना, शहरातील शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांना (Tution Classess), संताजी नगर  येथील विद्यार्थ्यांनाआणि चंदनखेड्यातील कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना निःशुल्क तिरंगा ध्वज दिले. या उपक्रमा बद्दल विवेकानंद महाविद्यालय चे प्राचार्य नामदेव उमाटे सर, लोकमान्य विद्यालयाचे उप प्राचार्य प्रा. सचिन सरपटवार सर, निळकंठराव शिंदे महाविद्यालय चे प्राचार्य लडके सर यांनी धन्यवाद दिले व अभिनंदन केले. या वेळी जिल्हा सह संयोजक बाळा प्रशांत भडगरे, नगर सह मंत्री यश चौधरी, क्षितिज कामतकर, गोपाल पराधे, वैभवी बेहरे, निविदिता मजुमदार, सूरज गुरानुले उपस्थित होते.

Comments