वरोरा 30/8/22
चेतन लूतडे
वरोरा शहरात दिव्यांग कलाकारांनी लोकांना भुरळ घातली असून दिव्यांग कलाकारांचा मिनी आर्केस्ट्रा बघण्यासाठी चौकामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.
दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले बोगापूरम दापत्य कलाकार सुरेल गात असून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जाऊन आपली रोजी रोटी कमवत आहे. आंध्र प्रदेश येथील उगोली येथील रहिवाशी लक्ष्मण बोगापुरम व त्यांची पत्नी अनुराधा भोगापूरम शहरातील चौकामध्ये एक स्पीकर घेऊन मिनी आर्केस्ट्रा सुरू करतात यामध्ये लोकांना मदतीचा हात मागत आपला उदरनिर्वा ते करीत आहे. या मिनी आर्केस्ट्रा मध्ये यांची पत्नी व एक स्पीकर याशिवाय दुसरं कोणीच नसतो. त्यामुळे सहानुभूती पर या अंधधापत्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थी महिला पुरुष , लहान मुले मोठ्या संख्येने मदत करीत आहेत. आपल्या अंधत्वावर मात करत हे दापत्य विविध शहरांमध्ये जाऊन आपला रोजगार मिळवित आहे. प्रत्येक चौकात हे दापत्य लोकांचे लक्ष वेधूत असून जनता त्यांच्या पाठीवर हात ठेवत भरघोस मदत करीत आहे.
यावेळी वरोरा शहरातील सुधाकर कूंकूले, नितीन मत्ते, अनिल पाटील, रोहन खनके, राजेंद्र मर्दाने आदी मान्यवरांनी या दापत्यांना मदत केली. वरोरा शहरात ही बातमी पसरतात त्यासाठी राहण्यासाठी सोय नसल्याने रॉयल प्लाझा इथे राहण्याची मोफत व्यवस्था नरेंद्र नेमाडे यांच्याकडून करून देण्यात आली.
वरोरा शहरातील इतके प्रेम मिळाल्याने या दाम्पत्यांनी सुद्धा वरोरा शहरातील लोकांचे आभार व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment