भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण विषयक जाणीव ठेवत ग्राहक पंचायत, भद्रावतीच्या पदाधिकाऱ्यांनी उमाटे सरांना एक झाड भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे सर नेहमी समाजासाठी सकारात्मक विचार ठेवत सामाजिक भावना जपत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करतांना दिसत असतात. विवेकानंद महाविद्यालय, योध्दा संन्याशी जेष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून जेष्ठांचे आरोग्य, मार्गदर्शन आणि युवकांसाठी आदर्श राहील असे अनेक कार्य ते करतात शिवाय ग्राहक पंचायतच्या कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असतोचं. भद्रावती शहरात त्यांच्या कार्याने एक वेगळी ओळख तयार झाली आहे.
अशा समाजकार्यकर्त्याला ग्राहक पंचायत भद्रावती तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम मत्ते, तालुकाध्यक्ष वामन नामपल्लीवार, संघटनमंत्री वसंत वऱ्हाटे, सचिव अशोक शेंडे, सहसचिव तथा प्रशिध्दी प्रमुख प्रविण चिमुरकर, सुदर्शन तनगुलवार, डॉ. उत्तम घोसरे यांची उपस्थिती होती.
ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणाचा असमतोल, बदलते ऋतुतक्र, शहराच्या सभोवताल होत असलेल्या कोळस्याची खाणं हे लक्षात घेता भद्रावती शहरात भविष्यात श्वास घ्यायला स्वच्छ निरोगी हवा मिळने कठिन होणार यांची सर्वांनी जाणीव ठेवने गरजेचे आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास मानवी जीवनास किती घातक ठरतो आहे. हे डोळ्यांना दिसुन सुध्दा मानवी जीव त्याचे समर्थनचं करतांना दिसत आहे. 'पर्यावरण वाचवा पृथ्वी वाचवा' असा नारा ग्राहक पंचायत, भद्रावतीचे सहसचिव प्रविण चिमुरकर यांनी दिला आहे आणि प्रत्येकाने स्वतःच्या वाढदिवसाला एक झाड नक्की लावा असे आवाहन जनतेला केले आहे.
Comments
Post a Comment