विवेकानंद महाविद्यालयात महायोगी श्री. अरविंद जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन प्रा.श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन

विवेकानंद महाविद्यालयात महायोगी श्री. अरविंद जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन 

 प्रा.श्रीकांत पाटील यांचे मार्गदर्शन

 भद्रावती : शहरातील विवेकानंद महाविद्यालयात संपूर्ण विश्वात आध्यात्मिक चेतना जागवणारे महर्षी श्री. अरविंद यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या तत्त्वचिंतनाचा जागर करणारा व संपूर्ण समर्पित असणारा जयंती समारंभ होणार आहे.

योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक -  मित्र मंडळ भद्रावती द्वारा १५ आॅगस्ट रोज सोमवारी दुपारी १२ वाजता विवेकानंद महाविद्यालयातील श्री. माॅ सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास विदर्भातील अभ्यासूवक्ते प्रा. श्रीकांत पाटील(वरोरा ) हे महायोगी "श्री. अरविंद यांचे जीवन व कार्य" या विषयावर प्रकाश टाकणार आहे. यावेळी  प्राचार्य नामदेव उमाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. भद्रावती परीसरातील नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. अरविंद सोसायटी सेंटर भद्रावतीचे सचिव डॉ. रमेश पारेलवार व योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक -  मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मते यांनी केले आहे.

Comments