वरोरा शहरात रानभाजी महोत्सव साजरा

वरोरा शहरात रानभाजी महोत्सव साजरा 

दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी  तालुका कृषि अधिकारी व आत्मा वरोरा  यांचे वतीने *रानभाजी महोत्सव* चे आयोजन  कांचनी शेतकरी उत्पादक कंपनी, आनंदवन चौक वरोरा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन मा. आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या शुभहस्ते थाटात पार पडले. कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून मा. बऱ्हाटे सर, जिल्हा अधीक्षक कृषि आधिकारी चंद्रपूर; मा. मकवाने मॅडम, तहसीलदार वरोरा; मा. ठाकरे सर, उपविभागीय कृषि अधिकारी वरोरा; मा. गोडशलवार सर, संवर्ग विकास अधिकारी वरोरा;  मा. पोतदार सर, प्राचार्य आनंद निकेतन कृषि महाविद्यालय वरोरा; मा. भोयर सर तालुका कृषि अधिकारी वरोरा यांची उपस्थिती लाभली. मा. उद्घाटक व सर्व प्रमुख अतिथी यांनी रानभाज्यांपासून तयार विविध व्यंजनांचा आस्वाद घेतला व उपक्रमाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. वरोरा तालुक्यातील बचत गट व शेतकरी यांनी विविध रानभाज्या व त्यापासून उत्पादित व्यंजनांचे स्टॉल लावून विक्री केली. या रानभाजी महोत्सवात आनंद निकेतन कृषि महाविद्यालय व विद्यार्थी तसेच अंबुजा फौंडेशन वरोरा यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून महोत्सवाची शोभा वाढविली.
     परिसरातील नागरिकांनी बहुगुणी रानभाजी खरेदीकरिता व विविध लज्जतदार व्यंजनांचा आस्वाद घेण्याकरिता रानभाजी महोत्सवात गर्दी केली. महोत्सवाच्या यशस्वितेकरिता तालुका कृषि अधिकारी वरोरा व आत्मा कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच कांचणी शेतकरी उत्पादक कंपनी यांनी परीश्रम घेतले.

Comments