महा आवास अभियान – ग्रामीण 2.0 सन 2021-22अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

-: 
महा आवास अभियान – ग्रामीण 2.0 सन 2021-22
अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा

सर्वांसाठी घरे – 2022 हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण असून राज्य शासनानेदेखील या धोरणाचा स्विकार केला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध ग्रामीण गृहनिर्माण योजना राबविण्यात येतात. घरकुलांच्या कामाची प्रगती केवळ संख्यात्मक न राहता गुणात्मक रहावी, नावीन्यपूर्ण कल्पना अमलात आणून लाभार्थ्यांना सर्व सुविधायुक्त असे घरकुल उपलब्ध करुन द्यावे, तसेच नैसर्गिक आपत्तीस सक्षमपणे समोरे जाणारे घरकुल बांधण्यास सर्वांनी पुढाकार घ्यावा असे शासनाचे ध्येय आहे. सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना अधिक गतिमान करण्यासाठी व गुणवत्तावाढीसाठी प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर, 2021 ते 30 जून, 2022 या कालावधीत महा आवास अभियान – ग्रामीण 2.0 सन 2021-22 राबविण्यात आले.
सदर अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमनिहाय साध्य प्रगतीनुसार गुणांकनाप्रमाणे मुल्यमापन करुन प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनांतर्गत ग्राम पंचायतींमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारांकरीता निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना तसेच ग्राम पंचायतींना श्री. अनिकेत सोनवाणे, तहसिलदार भद्रावती यांचे शुभहस्ते दिनांक 05 ऑगस्ट, 2022 रोजी प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन खालीलप्रमाणे लाभार्थींना तसेच सरपंच/सचिव यांना गौरविण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) – उत्कृष्ट घरकुल
1. उत्कृष्ट घरकूल - प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – श्रीमती गोपिका उमाजी राणे - ग्रा.पं. मुधोली
2. द्व‍ितीय पुरस्कार – श्री. हरीश्चंद्र शिवा आत्राम - ग्रा.पं. चिरादेवी
3. तृतीय पुरस्कार – श्री. रामेश्वर सुर्यभान नैताम - ग्रा.पं. डोंगरगांव (ख.)

2. उत्कृष्ट घरकूल – राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – श्री. भाऊराव चिरकुटा चौखे - ग्रा.पं. चंदनखेडा
2. द्व‍ितीय पुरस्कार – श्रीमती रेणूका विठ्ठल वालकोंडावार- ग्रा.पं. टाकळी
3. तृतीय पुरस्कार – श्रीमती प्रेमिला ज्ञानेश्वर आसुटकर – ग्रा.पं. चोरा

3. उत्कृष्ट ग्रामपंचायत - प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – ग्रा. पं. कोकेवाडा तु.
2. द्व‍ितीय पुरस्कार – ग्रा. पं. कोंढेगांव (माल)
3. तृतीय पुरस्कार – ग्रा. पं. मुधोली

4. उत्कृष्ट ग्रामपंचायत - राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण
1. प्रथम पुरस्कार – ग्रा. पं. चंदनखेडा
2. द्व‍ितीय पुरस्कार – ग्रा. पं. चपराळा
3. तृतीय पुरस्कार – ग्रा. पं. मानोरा सिं.

5. उत्कृष्ट क्लस्टर - प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
1. नंदोरी – कोकेवाडा - श्री. मिलींद नागदेवते, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता

6. उत्कृष्ट क्लस्टर - राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण
1. पाटाळा – माजरी - श्री. राकेश तुरारे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता

घरकुल विभागाचे डाटा एंट्री ऑपरेटर श्री. नितीन वेलपुलवार तसेच आपले सरकार सेवा केंद्राचे तालुका व्यवस्थापक श्री. रणजित डोंगे यांचासुध्दा यथोचित गौरव करण्यात आला.
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमामध्ये अतिवृष्टी व पुर परिस्थितीत उल्लेखनिय कामगिरी केलेल्या ग्राम विकास अधिकारी/ग्रामसेवक यांनासुध्दा प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 
1. श्री. सुनिल भिलसिंग जाधव, ग्रामसेवक चारगांव
2. कु. दर्शना भिमराव इंदोरकर, ग्रामसेवक विसलोन
3. श्री. राजेंद्र बाबुराव गणविर, ग्राम विकास अधिकारी माजरी
4. श्री. संजय भोलानाथ टोंगे, ग्राम विकास अधिकारी पाटाळा
5. श्री. प्रदिप निळकंठ आडकिणे, ग्राम विकास अधिकारी मनगांव

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर झेंडा अंतर्गत झेंडा विक्री केंद्राचे उद्घाटन करुन उपस्थित अधिकारी/कमचारी यांना झेंडा वाटप करण्यात आले.
सदर पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्ष स्थानी डॉ. मंगेश आरेवार, गट विकास अधिकारी, पं. स. भद्रावती हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. अनिकेत सोनवाणे, तहसिलदार भद्रावती हे होते. तसेच या कार्यक्रमास श्री. श्रीकांत बोबडे, सहाय्यक गट विकास अधिकारी, पं. स. भद्रावती उपस्थ‍ित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता पंचायत समिती अंतर्गत सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments