वरोरा एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा*

*वरोरा एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा*

*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांचे जिल्हाप्रशासनाकडे मागणी* 

चंद्रपूर : वरोरा येथील एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याच्या माध्यमातून दोन मोठ्या कंपनीतील कामगार तसेच इतर वाहनांची ये - जा सुरु असते. परंतु या रस्त्याची स्तिथी अत्यंत असुरक्षित व धोकादायक असल्याने अनेक अपघात होत आहे. त्यामुळे एमआयडीसी ते जिएमआर रस्त्याचे काम सात दिवसात पूर्ण करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. 

नियोजन भवन येथे बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, एमआयडीसी बुरेले, जिएमआरचे विनोद पुसदकर, अक्षय ठाकरे यांची उपस्थिती होती. 

एमआयडीसी च्या उड्डाण पुलासाठी जे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग बांधण्यात आला. परंतु तो सुद्धा पूर्णतः खराब झाल्याने रत्नमाला - वरोरा - मोहबाळा हा ग्रामीण रस्ता वापरला जात आहे. यामुळे गावकऱ्यांच्या सुरक्षेचा व रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले आहे. हा रस्ता सात दिवसात दुरुस्त करण्याची मागणी खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांनी केली आहे.

Comments