पूरग्रस्त वेकोली कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला इंटक महासचिव के.के .सिंह यांची भेट।

पूरग्रस्त वेकोली कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला इंटक महासचिव के.के .सिंह यांची भेट।

*वेकोली प्रशासनाकडे मदतीची मागणी*.

तालुका प्रतिनिधी भद्रावतीः- तालुक्यातील माजरी येथील पुराने प्रभावित झालेल्या शांतीनगर या वेकोली कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला इंटकचे महासचिव के.के. सिंह यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली व तेथील वेकोली कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला .त्याचप्रमाणे या वसाहतीतील नुकसानीचा आढावा घेऊन वेकोली प्रशासनासने येथील प्रभावित वेकोली कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली .
या संबंधात लवकरच वेकोली प्रशासनासोबत एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले या मागणीला भद्रावती वरोरा -क्षेत्राचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनीही पाठिंबा दिला आहे. आठवड्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे माजरी गाव अर्धे अधिक पाण्यात गेले होते ,यात वेकोली कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या माजरी येथील शांती वसाहतीत पुराचे पाणी घुसून येथील वेकोली कर्मचाऱ्यांचे कुटुंब प्रभावित झाले होते. घराघरात पाणी घुसल्यामुळे येथील कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला व त्यांचे मोठे आर्थिक नुकसानही झाले होते. यावेळी सिह त्यांचे सोबत आ. प्रतिभा धानोरकर, इंटक माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, संजय दुबे, परमानंद चौबे ,अनिल सिंह ,ओमप्रकाश वैद्य, साईनाथ वाकुलकर, अनंता आंबीलकर, गोलाकुंमरया ,सुनील श्रीवास्तव आदींची उपस्थिती होती.

Comments