भांदक रेल्वेस्थानकावर एक्प्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करा

भांदक रेल्वेस्थानकावर एक्प्रेस गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करा

प्रेस क्लब, भद्रावतीतर्फे खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन

भद्रावती (प्रतिनिधी) :- रवि बघेल 
शहरातील भांदक रेल्वेस्थानकावर एक्प्रेस गाड्यांचा थांबा कोरोना काळात बंद करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतरही या गाड्यांचे थांबे या स्थानकावर पूर्ववत करण्यात न आल्याने येथील प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन सदर स्थानकावर या गाड्यांचा थांबा पूर्ववत सुरू करुन प्रवाशांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन प्रेस क्लब, भद्रावती तर्फे खासदार बाळू धानोरकर यांना देण्यात आले. या स्थानकावर पूर्वी दक्षिण एक्स्प्रेस, अंदमान एक्सप्रेस, लखनऊ एक्सप्रेस, जोधपूर एक्सप्रेस, एर्नाकुलम एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे होते. मात्र कोरोना काळात बंद करण्यात आले असुन ते अद्यापही पूर्ववत करण्यात आले नाही. भद्रावती शहर परीसरात आयुधनिर्माणी शस्त्र कारखाना,कोळसा ग्लानी, थर्मल पॉवर स्टेशन असुन शहर तथा परिसरात देशाच्या सर्व प्रांतातील नागरिक राहतात.भद्रावती शहरा पर्यटन स्थळ  मान्यता मिळाल्याने येथे अनेक पर्यटक दुरुनदुरून भेट देण्यासाठी येतात. गाड्यांचे थांबे बंद करण्यात आल्याने या प्रवाशांना प्रवास करण्यात अडचणी येत आहेत.
निवेदन सादर करतांना प्रेस क्लबचे डॉ.यशवंत घुमे, अब्बास अजानी,सुनील पतरंगे,ईश्वर शर्मा, वतन लोणे,जावेद शेख,अशोक पोतदार, शंकर डे उपस्थित होते.

Comments