अभाविप भद्रावती तर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा.

अभाविप भद्रावती तर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा.

    अभाविप भद्रावती शाखे तर्फे राष्ट्रीय विद्यार्थी दिवस व ७४ वा अखिल भारतीय विद्यार्थी स्थापना दिवस लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अभाविप गडचिरोली विभाग संघटन मंत्री शक्तीजी केराम वक्ते म्हणून लाभले होते व त्यांनी कार्यक्रमाला संबोधन केले. राष्ट्रीय विद्यार्थी दिवसा सोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे चे स्थापना दिवस असल्याने याला वेगळा महत्त्व आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे देशातली नव्हे तर जगातील सर्वात मोठे छात्र संघटन आहे. अभाविप गेल्या ७४ वर्षां पासून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात अविरत पणे काम करत आहे. ' ज्ञान-शील-एकता ' हे अभाविप चे त्री सूत्र आहे. अभाविप वेग-वेगळ्या आयामांच्या माध्यमातून देश भरात विद्यार्थ्यांच्या विकासा करिता व विद्यार्थ्यां मध्ये नेतृत्व घडवण्या करिता काम करते असे व्याख्यान व आजचा विद्यार्थी कसा आहे, कसा असला पाहिजे हे वक्त्यांनी विद्यार्थ्यां पुढे मांडले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उ्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून अमितजी गुंडावार, प्रमूख अतिथी म्हणुन लोकमान्य विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सचिन सरपटवार सर व अभाविप भद्रावती शाखे चे अध्यक्ष प्रा. नितीन लांजेवार सर, भद्रावती नगरमंत्री जयेश प्रशांत भडगरे,यश चौधरी,गोपाल पारधे,  वैभवी बेहरे, संस्कार झाडे, निविदिता मुजुमदार, छकुली बावणे, प्रियंका चौवरे, खुशी असावले, गुलशन आषटनकर व मयुर भडगरे उपस्तीथ होते.

Comments