ऑल इंडिया कॅरम क्लबच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

ऑल इंडिया कॅरम क्लबच्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन वरोरा, २४ मार्च – ऑल इंडिया कॅरम क्लब, वरोरा यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चार दिवसीय कॅरम बोर्ड स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (२३ मार्च) सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वरोरा येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एहतेश्याम अली (माजी नगराध्यक्ष), शेख जैरुदीन छोटूभाई (जिल्हा शांतता समिती सदस्य, माजी सभापती, वरोरा व माजी संचालक, बाजार समिती), अनिल भाऊ झोटिंग (नगरसेवक व माजी उपाध्यक्ष), वसंतराव विधाते (जिल्हा सहकार बोर्ड अध्यक्ष) व यादवराव घ्यार (सामाजिक कार्यकर्ते) उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. छोटूभाई शेख यांनी याप्रसंगी बोलताना अशा प्रकारची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत वरोरा, जिल्हा चंद्रपूर, विदर्भ व राज्यातून मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी आयोजकांनी आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत: डबल प्रकार · प्रथम बक्षीस : ₹४१,००१ · द्वितीय बक्षीस : ₹२५,००१ · तृत...

माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पिपरी गावाला भेट*।*गावकऱ्या तर्फे निवेदन सादर*

*माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची पिपरी गावाला भेट*।
*गावकऱ्या तर्फे निवेदन सादर*

रवी बघेल भद्रावती
२९/०७/२२

तालुका प्रतिनिधी भद्रावती:- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भद्रावती तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या पिपरी गावाला भेट देऊन तेथील पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व पूरग्रस्तांशी संवाद  साधला. यावेळी पिपरी, घोणाड व कोच्ची गावकऱ्यां व राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका भद्रावती तर्फे नाम.अजित पवार यांना परिसरातील  समस्यांचे  निवेदन सादर करून या समस्या निवारण्याची मागणी केली.
गाव तथा परिसरातील समस्यांचा आपण शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी येथील गावकऱ्यांना दिले. पिपरी गावात आल्यानंतर ज्या ज्या भागात पुराने थैमान घातले त्या त्या भागाची त्यांनी पाहणी केली उकणी खाणीतील निघणाऱ्या मातीच्या भराव्यामुळे नदीचे पाणी थोपुन पिपरी गावात जेथून घुसले त्या नदीपात्राचीही त्यांनी पाहणी केली. याबरोबरच त्यांनी गाव तथा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला या दौऱ्यात अजित पवारांसोबत क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर ,सलील देशमुख,संजय खोडकेे,यांची उपस्थिती होती. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, नितीन भटाळकर, तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणनकर, विलास नेरकर, फैयाज शेख, सुनील महाले, रोहन कुटेमाटे,अमोल बड़गे,पनवेल शेंडे,संतोष वास्मवार, आशीष लिपटे,अनुप कुटेमाटे, डॉ.कुट्माटे, शिरसागर  ,रत्नाकर ठेबरे  सबीया देवगडे, किरण साळवे तथा सरपंच ताई, गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments