भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

भद्रावती येथील डोलारा परिसरातील नागरिकांने अडविला महामार्ग.

डोलारा तलावातील पाणी न वळवल्यास आंदोलनाचा इशारा.

रवि बघेल भद्रावती
26/7/22

गेल्या 15-20 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भद्रावती येथील डोलारा तलाव पाण्याने भरला असून, घराघरात पाणी शिरल्याने शेजारी राहणाऱ्या लोक वस्ती मधील नागरिकांचे प्रचंड हाल झाले. याबाबत प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा डोलारा परिसरातील लोकांनी दिला आहे.


यासंदर्भात वारंवार न.प.ला माहिती देऊन सुद्धा काहीच मार्ग निघाला नाही. त्यामुळे या परिसरातील लोकांनी एकत्र जमा होत बुधवारी सकाळी या संदर्भात नगराध्यक्ष व तहसीलदारांना निवेदन देत महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. अति पावसामुळे डोलारा तलावातील पाणी लोक वस्तीमध्ये शिरत असल्याने तेथील पाणी पंप द्वारे दुसऱ्या ठिकाणी वळविण्यात यावे अशी मागणी करीत लोकांनी तहसीलदार व नगराध्यक्ष केली होती.
परंतु प्रशासनाला जाग आली नाही त्यामुळे डोलारा येथील २००-२५० लोकांनी जमून तहसील कार्यालयात तहसीलदारांना घेराव करून निवेदन सादर केले , प्रशासनाने त्वरित समस्या न सोडवील्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा देत. कार्यालयासमोर घोषणाबाजी  देण्यात आल्या. यावेळी डोलारा परिसरातील बहुतांश कुटुंब उपस्थित होते.

परंतु प्रश्नाचे समाधान न मिळाल्याने डोलारा परिसरातील लोकांनी काही काळापुरता नागपूर चंद्रपूर महामार्गावर बसून आपला विरोध दर्शवत  आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती .

यानंतर प्रशासनाने तत्परता दाखवत डोलारा परिसरातील पाणी वळवण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन देत महामार्गावरील बसलेल्या आंदोलकाना  पोलीस साच्या साह्याने बाजूला करण्यात आले.

Comments