प्रवासी मृतकाच्या परिवाराला मुस्लिम बांधवांची मदत

प्रवासी मृतकाच्या परिवाराला मुस्लिम बांधवांची मदत

भद्रावती २४जुलै२२
रवि बघेल

रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या परिवारास भद्रावती येथील मुस्लिम समाज बांधवांनी माणुसकी जपत अंत्यविधीसाठी मदत केली असून शव त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करून दिल्याने माणुसकीची भिंत मुस्लिम बांधवांच्या कृपेने उभी राहिली आहे.

17 जुलै रोजी बिहारहून बंगळुरूला जात असताना भद्रावती रेल्वे स्टेशन  विजासन जवळ अकबर अन्सारी नामक मुलगा चालत्या सुपरफास्ट ट्रेनमधून खाली पडून मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास करत  बिहारमधील गोपालगंज गावचा रहिवासी असल्याचे कळाले. हा युवक कामासाठी  बिहारहून बंगळुरूला जात होते. त्याच्याजवळ असलेल्या आधारकार्ड मोबाईल वरून त्याची ओळख पटल्यावर कुटुंबीयांना सांगण्यात आले.

चार दिवसानंतर कुटुंबीय मुलाला पाहण्यासाठी आले असता ओळख पटली परंतु कुटुंबीय गरीब असल्याने बिहार मध्ये गाव असल्याने मृतदेह अंत्यविधीसाठी कसा न्यायचा असा प्रश्न पडला होता. यावेळी भद्रावती येथील मुस्लिम समाज बांधवांनी आर्थिक सहकार्य करत शव अंत्यविधीसाठी स्वगृही घेण्यासाठी व्यवस्था करून दिल्याने कुटुंबीयांनी खूप आभार व्यक्त केले. भद्रावती मधील मुस्लिम बांधवांची माणुसकीची  ही भिंत समाज कार्य करण्यासाठी प्रेरणास्थान आहे.

Comments