कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा

कत्तलीसाठी नेली जात असलेली ३० जनावरे वाचवली; पोलिसांचा मोठा छापा. जनावरांची अवैध वाहतूक उधळली, १९.५० लाखांचा मुद्देमाल जप्त बातमी:chetan lutade,warora/2/5/26 वरोरा (प्रतिनिधी) : वरोरा पोलीसांनी नाईट गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत ३० गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक उधळून लावली असून सुमारे १९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून इतर साथीदार पसार झाले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ मे रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास वणी-चंद्रपूर मार्गावरील शेंबळ नाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी नागपूरकडून येणारा आयशर कंटेनर (क्र. HR 55 T 4329) संशयास्पदरीत्या येताना दिसला. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर ट्रकमधील दोन इसम उडी मारून झुडपात पळून गेले, तर चालकाला ताब्यात घेण्यात आले. वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रकच्या मागील भागात ३० गोवंशीय बैल अत्यंत दाटीवाटीने, कोणतीही चारा-पाणी व्यवस्था न करता बांधून ठेवलेले आढळले. तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रे नसल्याचेही स्पष्ट झाले. ...

पट्टीदार वाघाने घेतला गोठ्याचा आसरा. दुपारपासून हा वाघ इथेच बसून आहे. गावकऱ्यांची झोप उडाली.

पट्टीदार वाघाने घेतला गोठ्याचा आसरा.

दुपारपासून हा वाघ इथेच बसून आहे.

गावकऱ्यांची झोप उडाली.
वरोरा
चेतन लूतडे वरोरा
 तालुक्यातील चारगाव बु. येथे मोठ्या पट्टेदार वाघाने सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे गोठ्यात आसरा घेतला आहे.

वरोरा चिमूर महामार्गावरील चारगाव बुद्रुक येथील शेतकरी संजय लाखे यांच्या गोठ्यात एका मोठ्या पट्टीदार वाघाने दुपारपासून ठाण मांडले असून नागरिक पाहण्यासाठी गर्दी करीत आहे. लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत गर्दी लागली असून मोबाईल मध्ये चित्रीकरण करण्यासाठी ओढ लागली आहे. वनविभागाला पाचारण केले असून अजून पर्यंत वनविभाग पोहोचू शकले नाही. संध्याकाळची वेळ झाली असून टॉर्च ने वाघावर प्रकाश दाखवून गावकरी फोटो काढण्याचा प्रयत्न करीत आहे. रात्रीच्या अंधारात गावामध्ये लाईट नसून गावकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. सततच्या पावसामुळे या वाघाने गोठ्याचा आश्रय घेत एका लाकडावर बसून असल्याचा  अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिसराला लागूनच ताडोबाचे जंगल लागून असल्याने या परिसरात हिस्त्र प्राण्यांचा वापर नेहमीच असतो.

Comments