लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश

लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल 

वरोरा दिनांक 8 जून
प्रशांत खूळे 

         दरवर्षीप्रमाणे उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले .

     कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 96. 79 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 96.5 टक्के तर कला शाखेचा निकाल 86. 30 टक्के लागला .
       वाणिज्य शाखेतून हिमांशी निकेश बोरा हिने 91 टक्के गुण घेऊन प्रथम स्थान पटकाविले तर सिद्धी धर्मेंद्र वरभे हिला 78.5 50% आणि ऋतिका घनश्याम शास्त्रकार हिला 78 . 17 टक्के गुण मिळाले. कला शाखेत ज्ञानेश्वरी उत्तम हिवरे हिने प्रथम स्थान पटकाविले. तिला 84. 33 टक्के गुण मिळाले, तर वैष्णवी अरविंद काळे हिला 77.33 आणि देवांगणा दिवाकर ननावरे हिला 77.17 टक्के गुण मिळाले. विज्ञान शाखेत समृद्धी नितीन देशपांडे हिने प्रथम स्थान मिळवीत 85. 50 टक्के गुण मिळविले तर वैष्णवी वासुदेव बोभाटे हिला 81 टक्के गुण मिळाले.
        लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील ,कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील, डॉ मिलिंद देशपांडे, प्राचार्य जयंत बंडावार, माजी प्राचार्य विलास कावलकर आणि संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले 


Comments