राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ३६० पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे ही नोकरभरती होऊ नये, यासाठी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत तर त्यांच्या पत्नीवरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत प्रश्न मांडले होते .
बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देऊन या घोटाळ्यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उचलून धरली होती. आता विशेष कार्यकारी अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीसोबतच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकांचा देखील समावेश आहे. धानोरकर दाम्पत्याने नोकर भरती थांबवून घोटाळा करणारे सदस्य व अधिकारी वर्गातील लोकांच्या मुसक्या आवळल्या आहे.
Comments
Post a Comment