गांधीसागर तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ

गांधीसागर तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ 

वरोरा दिनांक 7 मे 

वरोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधीसागर तलावातील जलसाठा ,व भूजल पातळी वाढविन्याचे उद्देशाने तलाव खोलीकरणाचे उद्घाटन शनिवार ला करण्यात आले.


 खा बाळू धानोरकर ,आ प्रतिभा धानोरकर ,उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, नपचे मुख्याधिकारी गजानन भोयर आदी मान्यवरांच्या हस्ते या खोलीकरणाच्या शुभारंभ करण्यात आला.


 गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून दरवर्षी खोलीकरण मोहीम राबविण्यात येते. यामध्ये तलावाच्या चारही बाजूने उंच पाळ निर्माण करणे, 12 फूट खोलीकरण करणे, तलावाच्या काठावर फिरण्या करिता ट्रॅक ची निर्मिती करणे, वृक्षारोपण, विद्युत व्यवस्था , बसण्याची व्यवस्था आणि तलावाचे सुशोभीकरण या बाबींचा समावेश यात असतो. यावर्षी पाच करोड लिटर जलसाठा होईल एवढे खोलीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तलावाचे एकूण क्षेत्रफळ 22.58 हेक्टर असून सामाजिक संस्था आणि इतरांनी सहभाग दर्शविल्यास हे उद्दिष्ट साध्य करता येईल असे मान्यवरांनी सांगितले.

 याप्रसंगी बोलताना खा धानोरकर यांनी हा तलाव महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असून तो तातडीने नगर परिषदेकडे हस्तांतरित करावा असे सांगत, तलावाच्या विकासाकरिता दहा कोटी रुपयाचे रुपयाचा निधी उपलब्ध करून देता येईल अशी ग्वाही दिली. उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनी सांगितले की माती घेऊन जाण्याकरिता शेतकरी आणि इतरांनी स्वतःची वाहतूक व्यवस्था करून माती घेऊन जावी. विशेष म्हणजे तलावाच्या तलावाच्या काठावरील तसेच रस्त्याच्या दुतर्फा संपूर्ण शहरात अतिक्रमण खूप वाढले असून त्यावर चिंता व्यक्त करण्यात आली.  यावर प्रशासन लवकरच कडक पावले उचलणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले.


 याप्रसंगी दिगंबर फाळके यांनी विधिवत पूजा केली.  नायब तहसीलदार काळे ,सुरज पुनवटकर श्री दलाल, जी एम आर कंपनीतर्फे विनोद पुसदकर, अकबर अली, वर्धा पॉवर चे मुकेश ओवे, तसेच रमेश राजूरकर ,विलास टिपले, मनीष जेठाणी ,प्रवीण सुराणा ,पंकज नाशिककर, प्रमोद काळे ,विलास नेरकर, राहुल देवडे, जयंत टेमुरडे मनोहर स्वामी, राजु फाळके, नितेश जयस्वाल ,मोहन रंगदल, बाबा भागडे, छोटू शेख, जगदीश तोटावार, डॉ ढवस ,रमेश मेश्राम आदींची उपस्थिती याप्रसंगी होती

 फोटो.... तलाव खोलीकरनाचे उद्घाटन करताना खा बाळू धानोरकर आ प्रतिभा धानोरकर व अन्य मान्यवर

Comments