भद्रावती रवी बघेल
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भद्रावती शाखे तर्फे 'ध्येय व्यक्तिमत्त्वाचे' या संकल्पनेतून ध्येय २०२२ व्यक्तिमत्त्व विकास शिबिर २९ मे रोजी घेण्यात आले. या शिबिरात Time Management(वेळेचे व्यवस्थापन), नेतृत्व गुणवत्ता, वक्तृत्व गुणवत्ता, Cyber Awareness (सायबर जागरूकता), करिअर मार्गदर्शन, स्वताची ओळक व आनंदी जीवन या सर्व विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अभाविप जिल्हा संघटन मंत्री अमितजी पटले, संजय पारधे व भद्रावती नगर मंत्री बाळा भडगरे यांनी केले. या शिबिराच्या सायबर जागरूकता या सत्राला सय्याक पोलिस निरीक्षक सुधिर वर्मा केले व आनंदी जीवन या विषयाचे मार्गदर्शन राजेश हजारे यांनी केले. या शिबिराला भद्रावती मधील वेगवेगळ्या विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या दरम्यान गणेश नक्षीने,बाळा भडगरे, यश चौधरी, तनुजा येरने, गोपाल पारधे, निविदिता मुजुमदार, वैभवी बेहरे, सुन्नी पेटकर, शाकील शेख,मनिष चौधरी, लोकेश घाटे, पियुष बनकर, मयुर भडगरे उपस्तीथ होते.
Comments
Post a Comment