रेल्वे अपघातात अनोळखी इसम मृत्यूमुखी**आत्महत्या की हत्या? याबाबत संभ्रम*

*रेल्वे अपघातात अनोळखी  इसम मृत्यूमुखी*

*आत्महत्या की हत्या? याबाबत  संभ्रम*

        *राजेंद्र मर्दाने/ चेतन लुतडे*

*वरोरा* :-  ग्रँड ट्रंक वरोरा - माजरी अप मार्गावरील ऍडवान्स स्टार्टर सिग्नल जवळील रेल्वे लाईनच्या पोल क्रमांक ८४१, १५ - १७ च्या दरम्यान बुधवार २५ मे च्या १.२० ते १.४५ चे दरम्यान एक अनोळखी इसम वय अंदाजे (५० वर्षे ) रेल्वे रूळावर जवळ कटलेल्या स्थितीत आढळला. उजव्या हातावर ' कृष्णा चौधरी ' नाव गोदून असले तरी अजूनही मृतकाची ओळख पटलेली नाही. संभवतः तो जवळपासच्या परिसरातला नसल्याने ही आत्महत्या की हत्या? याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. जिल्हा परिसरातील  कुणी व्यक्ती हरविल्याची माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन माजरी पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आले आहे.
     अधिक माहिती नुसार बुधवारी सकाळी १.२० ते १.४५  वाजताच्या सुमारास ऍडवान्स स्टार्टर सिग्नलजवळील अप लाईनवर रेल्वेने एक व्यक्ति कटून मरण पावल्याची माहिती फिर्यादी पॉइंटमन इंद्रजीत कुमार बिजेंद्रप्रसद (२७) रा. माजरी वस्ती यांनी दिली.  फिर्यादीच्या मेमोवरून पोलीस स्टेशन माजरी  येथे कलम १७४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी घटनास्थळी मृत पावलेला व्यक्ती सावळ्या रंगाचा, अंदाजे वय ५० वर्षे, उंची ५ फूट २ इंच, चेहरा अर्धवट कटलेला/ फुगलेला, अंगावर निळा टी शर्ट, निळा लोअर व कथ्थ्यारंगाची डिक्सी अंडरवेअर घातलेला आढळला. त्याच्या उजव्या हातावर ' कृष्णा चौधरी' नाव ही गोंदवून आहे. अनोळखी व्यक्ती म्हणून पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.
       उशीरापर्यंत  मृतकाची ओळख पटू शकली नाही. अंगावर टी शर्ट व लोअर परिधान केलेला व्यक्ती माजरी बाहेरचा असल्याचे कळते. अंगात टी शर्ट, लोअर, खिशात न पैसे, न ओळखपत्र, मध्यरात्रीची वेळ त्यामुळे हा मृत्यू संदेहास्पद असल्याचे कळते.  मृतकाने आत्महत्या केली? चालत्या रेल्वेतून खाली पडला? याबाबत संभ्रम आहे. तर दुसरीकडे हत्येला आत्महत्या? दाखविण्याच्या बनाव तर होत नाही ना? यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. 
      याबाबत अधिक तपास माजरी पोलीस करीत असून मृतकाची ओळख पटण्याकरिता कुणाकडे  मृतकाबद्दल अधिक माहिती/ हरविल्याची तक्रार असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे.

Comments