भद्रावती 4/5/22
रवि बघेल
भद्रावती तालुक्यातील भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा ग्रामपंचायत कडून दिव्यांगांना ५ टक्के निधी मधून दिव्यांगांना पाणीकॅन वाटप करण्यात आली.
भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम म्हणून नावारूपास आलेली चंदनखेडा ग्राम पंचायत नेहमीच कोणते ना कोणते उपक्रम राबवित असून उपक्रमशील ग्राम पंचायत म्हणून नेहमीच चर्चेत असते. अपंगांना काठीचा आधार या प्रमाणे ग्रामपंचायत च्या वार्षिक उत्पानातून गावातील दिव्यांगणाना ५ टक्के निधी खर्च करावा लागतो या अंतर्गत १ मे २०२२ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ग्राम पंचायत चंदनखेडा कडून ५ टक्के निधीतू भेट वस्तू म्हणून गावातील ४० दिव्यांगना उन्हाळ्यात थंडपाणी पिण्यासाठी पाणी कॅन वाटप करण्यात आले. सरपंच श्री नयन बाबाराव जांभूळे यांच्या हस्ते दिव्यांग व गरजूंना पाणीकॅन चे वाटप मोफत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचाय चे ग्रामविकास अधिकारी श्री किशोर नाईकवार तसेच उपसरपंच सौ भारतीताई उरकांडे तसेच ग्रामपंचायत चे सदस्य श्री निकेश भागवत, सौ. मुक्ता सोनूले, सौ. प्रतिभा दोहतरे, श्री. नाना बागडे, श्री. बंदुजी निखाते, सौ.श्वेता भोयर, सौ. सविता गायकवाड , सौ. आशा ननावरे, सौ. रंजना हनवते व गावातील दिव्यांग उपस्थित होते.
Comments
Post a Comment