भद्रावती येथे मेन रोड परिसरात सापडला पुरुषाचा मृतदेह.

भद्रावती येथे मेन रोड परिसरात सापडला पुरुषाचा मृतदेह.


भद्रावती मेन रोड परिसरात एका पस्तीस वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास मिळून आला.
रवी जाटोन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्ती बल्लारशा चा रहिवासी असून तो आपल्या सासुरवाडी ब्रांच तांडा येथे काही दिवसापासून राहत होता. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार रवी जाटोन हे बल्लारशा पेपर मिल येथे कार्यरत होता. त्यांना दारूचे व्यसन असल्याचे समजते.  अजून पर्यंत मृत्यूचे कारण माहीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आला आहे  पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.

Comments