वरोरा २०/५/२२
चेतन लूतडे
इंटरनॅशनल ट्रेडिशन शितो-रियू आणि कुबूडू काई असो. इंडीया यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन नेपाळ येथील काठमांडू शहरात करण्यात आले आहे. दरवर्षी या स्पर्धेसाठी भारतातील वेगवेगळ्या शहरातून निवड स्पर्धकांची निवड केली जाते.
त्यासाठी असोसिएशन सोबत संलग्नित असणाऱ्या संस्थांना याचा मान दिला जातो.
यावर्षी प्रथमच वरोरा शहरातील एअरबोन ट्रेनिंग स्कूल मधील अकरा विद्यार्थ्यांचा समावेश या निवड चाचणीत करण्यात आला आहे.
त्यासाठी वरोरा शहरातून निवड झालेल्या अकरा विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांचे मार्गदर्शक गुरु रवी चरूरकर व संस्थेचे अध्यक्ष सागर कोहळे ,प्रवीण चीमुरकर, रवी तुरानकर यांनी केले आहे.
या विद्यार्थ्यांसाठी लागणारे अर्थसहाय्य संस्थेशी संलग्न असणाऱ्या मान्यवरांनी व गांधी उद्यान योग मंडळांनी केले आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या मुलांची नावे खालील प्रमाणे आहे.
१)यश देविदास नरडे वय १५
२)यथार्थ प्रदीप नंदनवार वय १३
३)पियुष गजानन विधाने वय १३
४)सोनू रूपचंद निकोडे वय १४
५)अश्विनी गजानन नरड वय २३
६)दिव्या प्रदीप नंदनवार वय १९
७)निर्गुणा जगदीश पेंदोर वय १६
८)सानिया राजू आवारी वय १३
९)साक्षी शंकर पर्बत वय १७
१०)दुर्वाक्षी रवी भुजाडे वय १४
११)पायल नरेंद्र येरने वय १८
१२) ईशा एकनाथ वरभे वय १६
वरील विद्यार्थ्यांची निवड काठमांडू येथे होणाऱ्या कराटे स्पर्धे दरम्यान झाली असून येत्या २४ ते २८ तारखेला काठमांडू येथे ही स्पर्धा होत असून या स्पर्धका सोबत त्यांचे कोच रवी चरूरकर विद्यार्थ्यांसोबत जाणार आहे.
Comments
Post a Comment