खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे---- धनंजय देशपांडे

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे- धनंजय देशपांडे

वरोरा दिनांक 15 मे
प्रशांत खूळे

## उन्हाळी शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रतिपादन 
## जी एम आर तर्फे प्रतिभावंतांचा  सत्कार

             विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या आवडीनिवडी जपाव्या . विविध क्षेत्रात करिअर करताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे आणि त्यात मन लावून काम केल्यास यशाचे शिखर गाठता येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्थांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी जीवनात मोठी झेप घेऊ शकतात असे प्रतिपादन जी. एम .आर. वीज कंपनीचे मुख्य प्रबंधक धनंजय देशपांडे यांनी केले. लोक शिक्षण संस्थेद्वारा आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.



        या प्रसंगी व्यासपीठावर लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा श्रीकांत पाटील आणि कार्यवाह श्रीकृष्ण घड्याळपाटील यांची उपस्थिती होती.



         जी एम आर तर्फे चालविल्या जाणाऱ्या प्रतिभा वाचनालयातील अद्ययावत संगणक कक्षाचे आणि विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.                     
        आपल्या प्रतिपादनात प्रा श्रीकांत पाटील यांनी प्रतिभा वाचनालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करीत, विद्यार्थ्यांनी आता स्पर्धा परीक्षांमध्ये अधिकाधिक सहभागी होऊन यश मिळविणे गरजेचे झाले आहे असे सांगत, प्रतिभा केंद्राचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन केले.  तर श्रीकृष्ण घड्याळपाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता लोक शिक्षण संस्था कटिबद्ध असून यापुढे नव उपक्रमाला प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.


 याप्रसंगी शिबिरार्थींनी प्रज्ञावर्धन स्तोत्र, प्राणायाम, आसने, संस्कृत कथा, क्रीडा नृत्य, घोष रचना, कलाविष्कार आणि योग नृत्याचे प्रात्यक्षिके  सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रतिभा वाचनालयातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या सोळा विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच धनंजय देशपांडे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने प्रा श्रीकांत पाटील आणि घड्याळपाटील यांनी शॉल ,श्रीफळ आणि ग्रंथ भेट देऊन केला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य जयंत बंडावर यांनी तर संचालन रवींद्र पवार व डॉ प्रशांत खुळे यांनी केले. प्रा उत्तम देऊळकर यांनी अहवाल वाचन केले.  जीएमआर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विनोद पुसदकर, सुनील विश्वकर्मा ,श्री मुरली ,पालक, शिक्षक आणि मान्यवरांची उपस्थिती याप्रसंगी मोठ्या प्रमाणात होती

 

Comments