तालुका कृषि अधिकारी भद्रावती आयोजित कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजने अंतर्गत खरीप हंगाम पूर्व कार्यशाळाचे आयोजन दिनांक 12/05/2022 रोजी, कृषि भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री दत्तात्रय गुंडावार, चिंचाळा रि., मांगली, ता भद्रावती यांचे शेतामध्ये करण्यात आले. कार्यशाळेमध्ये SRT पद्धतीने धान पिकाची लागवड बाबत श्री दत्तात्रय गुंडावार यांनी प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करण्यात केले व मागिल वर्षी त्यांनी SRT पद्धतीने धानाची लागवड केल्यामुळे त्यांचा रुपये 15 हजार उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ झाली असा अनुभव त्यांनी शेतकऱ्यांना सांगितला. तसेच धान बियांनावर 3 टक्के मिठाची बीजप्रक्रिया व सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासणे व बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व धान व सोयाबीन पिक विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना श्री एम. एस. वरभे, कृषी पर्यवेक्षक चंदनखेडा यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी भद्रावती कु. मोहिनी जाधव यांनी केले व SRT पद्धतीने धान पिकाची लागवड करून उत्पादन खर्चात बचत करावी व बियाण्याची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी असे उपस्थित शेतकऱ्यांना आव्हान केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक भद्रावती श्री सुधीर हिवसे यांनी केले. कार्यशाळेला मंडळ कृषि अधिकारी भद्रावती श्री. यु. बी. झाडे, कृषि पर्यवेक्षक श्री. पी. एम. ठेंगणे, कृषि सहाय्यक मांगली कु. जे. बी. नेहारे, कृषि सहाय्यक घोट निंबाळा कु. सिद्धी शिंदे व परिसरातील भात व सोयाबीन पिकाची लागवड करणारे शेतकरी बंधू व भगिनी यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment