महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जनतेने मानले आभार

महाराष्ट्र दिनी ग्रामीण भागातील बस सेवा सुरळीत
निवेदनाचा पाठपुरावा करून   ग्रामीण भागासाठी बस सेवा सुरू केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे ग्रामीण भागातील जनतेने मानले आभार


चेतन लूतडे
1/5/22
महाराष्ट्र सरकारचा बस कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर शहरी भागातील बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ग्रामीण क्षेत्रातील लालपरी अजूनही बंद पडली आहे. याचा फटका सर्वसाधारण ग्रामीण जनतेला बसत असून उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे कॉंग्रेस पक्षाचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी वरोरा बस आगाराला निवेदन सादर केले होते ‌.

यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर तर राष्ट्रवादी संघटनेच्या नेत्यांनी ग्रामीण भागातील वरोरा ते सावरी व वरोरा ते मूधोली ही बस सेवा तात्काळ सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला याचा फायदा मिळणार आहे. बऱ्याच भागातील बस सेवा विस्कळीत झाले असून येणाऱ्या दिवसात ही सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन आगार प्रमुखांनी यांनी दिले.
यावेळी बस सेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास नेरकर व सुधाकर रोहणकर यांनी अथक प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Comments