ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी संघटनेतर्फे वरोरा आगाराला निवेदन

ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्याबाबत राष्ट्रवादी संघटनेतर्फे वरोरा आगाराला निवेदन

चेतन लूतडे
27/4/22
महाराष्ट्र सरकारचा बस कर्मचाऱ्यांचा संप संपल्यानंतर शहरी भागातील बस सेवा सुरू करण्यात आली. मात्र ग्रामीण क्षेत्रातील लालपरी अजूनही बंद पडली आहे. याचा फटका सर्वसाधारण ग्रामीण जनतेला बसत असून उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे ग्रामीण भागातील जनतेला पायपीट करावी लागत आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते सुधाकर रोहणकर यांनी वरोरा बस आगाराला निवेदन सादर केले आहे. 
कोरोना काळा पासून बस सेवा दोन वर्षापासून बंद असल्यामुळे जनतेला व शाळकरी विद्यार्थ्यांना येणे जाणे करिता होणारा त्रासामुळे बस सेवा सुरू करण्याकरिता जनतेने केलेल्या मागणीनुसार एसटी बस आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभाग वरोरा प्रमुख पीए रामटेके साहेब यांना निवेदन देऊन वरोरा ते जामगाव पावना धामणी  सागरा भिजुनी शेगाव खुर्द चंदनखेडा सावरी खुटवडा मार्ग येथे जाण्याकरिता तसेच वरोरा शेगाव  मानोरा कारेगाव आस्था  वडाळा घोसरी मुधोली मार्ग बस सेवा सुरू करण्याकरिता मागणी केली. आगार प्रमुख यांनी येत्या 30/04/2022 रोजी या दोनही मार्गावरील बस सेवा सुरू करून देण्याची हमी देण्यात आली.

Comments