वरोरा शहरात किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ आंदोलन.

वरोरा शहरात किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ आंदोलन.

वरोरा
चेतन लूतडे

चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात स्थानिया जुनी नगरपालिकेच्या समोर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलनात  करण्यात आली.

आयएनएस विक्रांत या नावाखाली गोळा केलेला पैशाचा किरीट सोमय्या यांनी घोटाळा करून देशाची गद्दारी केली आहे त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा. अशी मागणी शिवसेनेतर्फे महाराष्ट्र करण्यात आली आहे.

2013 ला आय एन एस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरू केली होती. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शविली होती तेव्हा किरीट सोमय्या यांनी पुढे येऊन समाजातून प्रचंड निधी गोळा केला होता. त्यावेळेस विमानतळ ,रेल्वे स्टेशन वर विक्रांत वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्यात आले होते. देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात पैसे दिले होते. नेव्ही नगर मध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले होते.
विक्रांत युद्धनौकेच्या स्मारक बनवण्याकरिता राजभवन येथे पैसे जमा करण्याचे आश्वासन किरीट सोमय्या यांनी लोकांना दिले होते.
मात्र सोमय्या यांनी जमा केलेले पैसे राजभवनात पोहोचलेच नाही असे आरटीआय मध्ये समोर आल्याने . लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांच्या देश प्रेमाशी किरीट सोमय्या यांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्याची मागणी महाराष्ट्रात शिवसेनेने केली आहे.
त्यामुळे वरोडा शहरात सुद्धा शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी चौका चौकात जाऊन किरीट सोमय्या यांचा निषेध करतो आंदोलन केले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, मनिष जेठणी, पिंटू मेश्राम, दिनेश यादव सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Comments