माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ शांती कॅन्डल मार्च चे आयोजन
भद्रावती
रवि बघेल 6/4/22
दि.४ एप्रिल ला भद्रावती येथील शासकीय I.T.I. समोर एका महिलेचे मुंडके नसलेले नग्नावस्थेत असलेले प्रेत एका शेतात आढळुन आले.या घटनेची वार्ता शहरात पसरताच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात अशा प्रकारची पहीलीच घटना असुन शहराला काळीमा फासनारी आहे. या घटनेने भद्रावती शहरातील महिलांमध्ये तिव्र संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध/धिक्कार व चौकशीच्या मागणी साठी संपुर्ण शहरातील नागरीकांतर्फे बुधवार दि.६ एप्रीलला " शांति कँडल मार्च " चे आयोजन करन्यात आले होते.
" शांति कँडल मार्च " नागमंदीर येथुन सुरु होऊन .मान बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार जवळ निषेध सभा घेण्यात आली.
तरि भद्रावती येथील संपुर्ण नागरिक,महिला,युवक,विध्यार्थी यांनी या "कँडल मार्च" मध्ये सहभागी होतया.
Comments
Post a Comment