लोक शिक्षण संस्थेच्या परिसरात उन्हाळी शिबिराचे आयोजन
वरोरा दिनांक 27 एप्रिल22
प्रशांत खूळे वरोरा
लोकशिक्षण संस्था वरोरा च्या वतीने विविध खेळ, कला आणि घोष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लोक शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .
दरवर्षी या उन्हाळी शिबिराला मुलांचा मोठा सहभाग असतो. यावर्षी 2 मे ते 14 मे दरम्यान हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेस हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यात कबड्डी ,हॉलीबॉल, योगा, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. संस्कृत संभाषण आणि विज्ञान शोध प्रकल्प शिबिर याचेही आयोजन याच दरम्यान केले गेले आहे. कला शिबिर घोष प्रशिक्षण शिबिर आणि गायन ,तबला आणि हार्मोनियम प्रशिक्षण शिबिराचा ही समावेश यात करण्यात आला आहे.
या शिबिरादरम्यान राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू व प्रशिक्षकांचे मार्गदर्शन सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहे . शारीरिक क्षमता, आहार विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, उच्चार शुद्धतेसाठी संस्कृत स्त्रोत पठाण आणि वैज्ञानिक संशोधन वृत्ती वर या शिबिरात भर राहणार असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
इच्छुकांनी
प्रा उत्तम देऊळकर (94 23 61 03 6 3 )
अनिल घुबडे ( 94 20 30 20 36) आणि सारंग धनेगावकर (98 23 89 51 11) यांचेशी संपर्क करावा असे कळविले आहे
Comments
Post a Comment