कांचन गडकरी उद्या वरोड्यात*संकल्प सिद्धी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

*कांचन गडकरी उद्या वरोड्यात*
संकल्प सिद्धी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन
 
वरोडा : तभा वृत्तसेवा

संस्कार भारती वरोडा शाखेचे माजी अध्यक्ष स्व. अॅड.श्रीपाद पाटील यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ संस्कार भारतीच्या वरोडा शाखेतर्फे मंगळवार २६ एप्रिलला 'संकल्पसिद्धी ' या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन  सायंकाळी 6.30 वाजता लोकमान्य प्राथमिक विद्यालयाच्या रंगमंचावर करण्यात आले आहे.या कार्यक्रमात सौ. कांचन गडकरी यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 

     स्व.अॅड. श्रीपाद पाटील यांचा  संस्कार भारती साहित्य विधेतर्फे 'चौदा विद्या चौसष्ट कला ' या विशेषांकनिर्मितीचा मानस होता. हा संकल्प त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पूर्णत्वास जात असून श्रीपाद पाटील यांच्या निवडक साहित्याचे संकलन असलेल्या 'गूज अंतरीचे'  या पुस्तकाचेही प्रकाशन याप्रसंगी होणार आहे .
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.श्रीकांत पाटील तर विशेष अतिथी म्हणून सौ. कांचन गडकरी आणि प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रवींद्र शिंदे ,डॉ.कुमार शास्त्री आणि चंद्रकांत घरोटे उपस्थित राहणार आहेत. 
       या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कार भारती वरोडा शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Comments