शेगाव येथील तंटा मुक्त समिती अध्यक्षाची हत्या......

शेगाव येथील तंटा मुक्त समिती अध्यक्षाची हत्या......

 गावात संतापाची लाट ... 

दोन दिवसांपूर्वी खूण झाला असल्याचा अंदाज .. 

पोलिसांची काटेकोर पणे चौकशी ... 

शेगाव बू .

स्थानिक शेगाव बू येथील नव युवक समाज सेवा करणारा तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शेगाव बूजरूक चे अध्यक्ष कू  महेश घोडमारे याची हत्या झाली असल्याची माहिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उधडकिस आली आहे ..

 शेगाव येथील तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष श्री महेश घोडमारे समाज सेवक असून तो  खाजगी क्षेत्रात तो जातीचे प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , असे विविध कामे तो करून जनतेची सेवा करीत होता त्याच बरोबर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करीत होता .. 
   विशेष म्हणजे  महेश हा सर्व कामात तरबेज असून तो गावात तसेच गाव परिसरात त्याची चांगली प्रतिमा होती . परंतु  गेल्या दोन दिवसापासून  महेश हा आपल्या कामाकरीता बाहेर गेला होता तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली शिवाय काल  २२ तारखेला त्यांच्या भावाने पोलीस स्टेशन शेगाव येथे माझा भाऊ हरविला असल्याची लेखी तक्रार दिली  तेव्हा येथील पोलीस कर्मचारी देखील आपल्या कामात व्यस्त होते दरम्यान आज सकाळी  त्यांच्या भाऊ याने अधिक माहिती घेतली असता माझा भाऊ  मेसा येथून दुसऱ्याच्या दूचाकी वर बसून वरोरा येथे रवाना झाला असल्याची माहिती समोर आली  शिवाय ही गाडी मेसा समोरील जंगलात उभी असल्याची खात्री काही लोकांनी दिली यांच्या आधारे  घटना स्थळ गाठले असता झुडपात त्याची चप्पल , रक्त , रक्त बांबाळ असलेले लोखंडी रॉड , व झुडपाच्या मागे प्रेत आढळून आले तेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना देताच  येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या ताफ्यासह सर्व कर्मचारी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत ...  वृत्त लीहे पर्यंत मृत्यूचे मुख्य कारण समजले नव्हते .

Comments