एसबीआय वरोरा शाखेतील कर्मचाऱ्यांची मुजोरी

एसबीआय वरोरा शाखेची मुजोरी 

बँकेतील ग्राहकाचा एक्सीडेंट  झाल्यास परिवारास पैसे मिळणार नाही.

मेल्यावरच नोमिनीस पैसे मिळणार. डेप्टी बँक मॅनेजर वरोरा

22/4/2022
वरोरा
चेतन लूतडे

वरोरा येथील एसबीआय शाखेची मुजोरी बऱ्याच दिवसापासून ग्राहकांना पाहायला मिळत आहे. यावर कोणतीही अधिकारी लक्ष देण्यास तयार नाही. ही बँक लोकांच्या व्यवहारासाठी आहे की फक्त या बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी. दिवसेंदिवस काही कर्मचाऱ्यांची मुजोरी वाढत चालली असून सर्वसाधारण ग्राहकाची समस्या सुद्धा जाणून घेण्यासाठी वेळ नाही . त्यामुळे बरेच खाते या बँकेतून वळते झालेले आहे. व्यापारी सुद्धा त्रासले आहेत.

अशीच घटना 18 तारखेला चार वाजताच्या  दरम्यान पाहायला मिळाली वरोरा येथील कॉन्टॅक्टर मुकेश नेमाडे यांचा सावली जवळ गंभीर अपघात झाला होता. अपघातामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली असून दोन्ही हात फॅक्चर झाले आहे. त्यांच्या चेहऱ्याचे ऑपरेशन झाल्याने बराच खर्च झाला आहे.  जीवन-मरणाच्या अशा नाजूक परिस्थितीमध्ये गेल्या आठ दिवसापासून भरपूर खर्च  झाला आहे. आता हॉस्पिटल चे पैसे भरण्याकरिता पैसे जवळ नसल्याने शेवटचा उपाय म्हणून वरोरा येथील एसबीआय बँकेतील पैसे काढण्यासाठी त्यांच्या परिवाराने  प्रयत्न सुरू केला. परंतु गेल्या पाच दिवसापासून  हि बँक त्यांच्या परिवाराला हेलपाटे घालायला लावत आहे. 
या बँकेत डेप्टी मॅनेजर म्हणून कार्यरत असणाऱ्या महिलेने मुकेश नेमाडे यांच्या मुलीला वडील मरण पावले तरच नॉमिनी ला पैसे देऊ अन्यथा कोणताही कायदा बँकेचा नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट मत सांगितल्याने त्यांच्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

तरीही जिद्द न सोडता मुलीने प्रयत्न सुरू ठेवले. बँकेतील डेप्टी मॅनेजरला कायद्याप्रमाणे तडजोड करण्यासाठी परिवाराने प्रयत्न सुरू केला.त्यांच्या एक्सीडेंट चे फोटो दाखवण्यात आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नागपूर येथील संबंधित डॉक्टराचे मेडिकल सर्टिफिकेट  दाखविण्यात आले. विनंती म्हणुन नागपूर येथील ब्रांच मार्फत व्हेरिफिकेशन करण्याची विनंती केली. यानंतर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथ पत्र देण्याचे मुलीने सांगितले. वडिलांचे व मुलीचे आधार कार्ड पाहण्याची विनंती केली, पत्नीच्या नावावर पैसे देण्यात यावे किंवा डॉक्टर च्या खात्यात पैसे वळते करण्याचे सुद्धा विनंती केली. परंतु कसलाही पाजार या बँकेतील महिला कर्मचारीला फूटला नाही. शेवटी दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव सांगून डेप्युटी मॅनेजर कर्तव्यापासून मोकळे झाले. त्यांच्या खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या लहान मुलाचे लाड पुरवण्यात गुंग झाले.

शेवटी या महिलेने एक फुकटचा सल्ला मुली सोबत आलेल्या नातेवाईकाला दिला. त्या म्हणाल्या तुम्हीच पैसे भरून टाका ते बरे होऊन आल्यावर  तुमचे पैसे काढून घ्या. अशा निष्टुर कर्मचाऱ्यांसाठी एसबीआय चा कायदा आहे का हा मोठा प्रश्न आहे.
बाबाला वाचवण्यासाठी मुलीचे पूर्ण प्रयत्न सुरू होते त्यामुळे शेवटी ही घटना पत्रकारांना सांगण्यात आली.  मुलीला त्यांच्या परिवाराचे पैसे बँकेत असून सुद्धा वेळेत मिळाले नसल्याने दुःख झाले. सध्या मुकेश नेमाडे नागपूरला उपचार घेत आहे. पण एसबीआय बँकेतील या कर्मचाऱ्यांना वरच्या अधिकाऱ्यांना अशा परिस्थितीत नियम विचारण्याची सुद्धा वेळ नाही. मात्र ही महिला आपल्या मुलाला बँकेमध्ये आणून जेवण घालण्यात व्यस्त होती. अशा बँकेत ग्राहकांनी का बर खाते काढावे असा मोठा प्रश्न वरोरा मध्ये निर्माण झाला आहे.

त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करणे व ग्राहकास योग्य कागदपत्राच्या आधारे पैसे परत द्यावे ही मागणी परिवाराने बँकेला केली आहे.

वरील सगळा प्रकार कॅमेरा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
अशी बरेच प्रकार वरोरा एसबीआय बँकेत होत असून नामवंत व्यापारी ग्राहकानी त्रासून आपले खाते बंद केले आहेत.

शेवटपर्यंत पैसे मिळाले नाही. मुकेश नेमाडे यांची प्रकृती थोडी बरी झाली आहे. नागपुर हॉस्पिटल मधुन घरी परत आलेले आहे. आता बँकेत जाण्याची वेळ ते पाहत आहे.

Comments