जनसंपर्क कार्यालय समस्या निवारण सेतू ठरेल - खासदार बाळू धानोरकर*

*जनसंपर्क कार्यालय समस्या निवारण सेतू ठरेल - खासदार बाळू धानोरकर*

*जनसंपर्क कार्यालय तळागाळातील माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी सेवा केंद्र ठरेल - आमदार प्रतिभाताई धानोरकर*

चंद्रपुर - मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालय समस्या निवारण सेतू ठरेल, अशी आशा खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली. 

आज दिनांक 16/04/2022 रोज शनिवारला भद्रावती येथील धानोरकर कार्यालयाचा उदघाटन  सोहळा  माननीय खासदार बाळू भाऊ धानोरकर व माननीय आमदार प्रतिभाताई धानोरकर  यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या कार्यालयच्या उदघाटन प्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

यावेळी बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले, भद्रावती तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी सोडविण्यासाठी स्थानिक स्तरावर सोय व्हावी यासाठी जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांना थेट आमच्याकडे तक्रार पोहोचविण्यासाठी हा सेतू बांधण्यात आला आहे, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. 

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, जनसंपर्क कार्यालया च्या माध्यमातून नागरीक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात संवाद होईल. जो तळागाळातील माणसांच्या समस्या सोडविण्यासाठी सेवा केंद्र ठरेल. शिवाय शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाचे ठिकाण ठरेल.

यावेळी  तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, शहर अध्यक्ष सुरज गावंडे, विनयबोधी डोंगरे, धनंजय गुंडावर, लक्ष्मण जी बोढाले , राजुभाऊ चिकटे सभापती वरोरा, विलासभाऊ टिपले शहर अध्यक्ष वरोरा, प्रमोद नागोसे, निखिल राऊत, सरिता सुर शहर अध्यक्षा  वर्षा ठाकरे तालुकाध्यकक्षा  दातारकर,  आरेवार, नगरसेवक नगरसेविका सुधीर मुडेवार,अनिल चौधरी, अशोक येरगुडे, यांची उपस्थिती होती.

Comments