ढोरवासरी पिंपरी मार्गालगत प्रकरणातील आरोपीस अटक
चेतन लूतडे वरोरा
काही दिवसापूर्वी भद्रावती शहरातील ढोरवासरा पिपरी मार्गालगत सरकारी शाळे समोरील शेतामध्ये निर्वस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचे शिर नसल्याने पोलिसांचा तपास सुरु होता . यानंतर चंद्रपूर पोलिसांनी नागपूर येथील रामटेक परिसरातील मृतक तरुणी असल्याचे व्यक्त केले होते. यानंतर पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता या प्रकरणाची सगळी माहिती समोर आली. या दोघीही मैत्रिणी असून मृतक तरूणी ही या अल्पवयीन मुलींचा वारंवार अपमान करत असल्यामुळे हे प्रकरण घडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अपमानाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आल्याची कबुली या अल्पवयीन मुलीने दिली आहे.
अल्पवयीन मुलगी व त्याच्या साथीदारांने यासंबंधात कट करून मृतक तरुणी चंद्रपूर येथे बोलावून घेतले होते. यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण उघडकीस येऊ नये यासाठी मृतकाचा गळा कापून चंद्रपूर येथील राम शेतू पूलांच्या नदीत टाकून देण्यात आला होता. पोलिसांच्या बऱ्याच प्रयत्नानंतर मृतक तरुणी चे शीर काढण्यात यश आले.
चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली असून या संबंधित सहकारी आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
Comments
Post a Comment