वरोरा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षा तर्फे मालवीय वार्ड मध्ये आरोग्य तपासणी करून महिलांना औषधी उपचार करण्यात आले स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. ८ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश हाच आहे की स्त्रियांना सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांची जाणीव करून देणे आज आपण जेंव्हा आसपास पाहतो तेंव्हा असं लक्षात येतं की महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली आहे त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले आहे.
घर, व्यवसाय, नोकरी अशा विविध आघाड्यांवर स्त्री लढत असताना तिच्या आरोग्याकडे तिचे दुर्लक्ष होत असते किंवा काही स्त्रियांना परिस्थितीमुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. याच स्त्रीच्या सन्मानासाठी आणि स्वतःच्या आरोग्याबाबत महिलांनी जागृत व्हावे म्हणून राष्ट्रवादी महिला काँग्रेस वरोरा शहर तर्फे 'प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान' आयोजित करण्यात आले होते.
या अभियानांतर्गत महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येणाऱ्या ऍनिमिया , जीवनसत्व D, B12 च्या कमतरतेच्या अनुषंगाने गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात मान्यवरांनी आणि वरोरा उपरुग्णालय च्या डॉ आणि यांच्या पथक डॉ प्रतीक दारुनडे, डॉ राजश्री मेंढे,वंदना बरडे,नेहा इंदूरकर ,तनिष्का खडसाने,सुनीता नरडे, मोनाली काकडे,सुशीला तेलमोरे, वंदना डाखरे,जनाबाई पिप्लशेंडे,शिल्पा रुयारकर, दीपा पालेरवार,जयश्री कुंभारे,मंदा गवई,सौ सहारे,लता हिवरकर,लीना लोखंडे, मनीषा पिसे,सौ उपरे आणि प्रामुख्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इत्यादी कार्यकर्त्या उपस्थित होते
Comments
Post a Comment