व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन ने दिली दिलखुलास पार्टी
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शहरातील नामवंत व्यक्तींचा एक समूह गेल्या 2014 पासून कार्यरत आहे.
या माध्यमातून सामाजिक स्तरातील कामे हाती घेऊन गरजू लोकांची मदत केली गेली जाते. त्यामुळे हा समूह महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. वरोरा शहरातील गुढीपाडवा महोत्सव, कोरोना कालावधी ऑक्सिजन ब्रिगेडची स्थापना, स्वर्गरथ , तलाव खोलीकरण, अशा सामाजिक बांधिलकीनि बांधलेला हा समूह ज्याच्या कार्याची दखल घेऊन मंत्री नितीन गडकरी यांनी हायटेक ॲम्बुलन्स प्रधान केली. असा पार्श्व इतिहास लाभलेले गांधी उद्यान योग मंडळ केल्या सात वर्षापासून वरोरा शहरात कार्यरत आहे. यामध्ये डॉक्टर ,इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर, व्यापारी, शेतकरी सर्व स्तरातील मैत्री जपणारे मित्र असून भारतासह विदेशात राहत असून फक्त व्हाट्सअप ग्रुप मध्ये जोडलेले आहे. ह्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी वरोरा येथील नरेंद्र नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली चालत असलेला हा मित्रत्वाचा समूह ज्याचे नाव व्हाट्सअप ग्रुप वर 'कॉमेडी ग्रुप' ने नावाजलेला आहे. मित्र स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला .
या ग्रुप ॲडमिनने ग्रुपमधील सदस्यांना आमंत्रित करून वरोरा येथील परी लाॅन येथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केल्याने ऍडमिन असावा तर असा ज्यांनी भव्य-दिव्य पार्टी आयोजित करून सगळ्या सदस्यांना चकित केले. यामध्ये भारतासह विदेशातून मित्र आले. यावेळी त्यांच्या भावूक प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतातील प्रत्येक व्यक्तीं आपली संस्कृती व आपले मित्र जपले तर मनुष्यातील निराशा दूर होतील असे मत सुचवले.
या पार्टीचा मुख्य उद्देश भविष्यात सामाजिक स्तरावर काम करणे असून गरजू व्यक्तींना अत्यावश्यक सेवा चांगल्या रीतीने पोहोचविण्याचा मानस सगळ्या सदस्यांनी व्यक्त केला.
आपण कुठे राहतो हे महत्त्वाचे नाही आपण भारतीय आहोत, मित्र जपले पाहिजेत आणि आपण आपल्या देशासाठी काय करतो आहेत याचे भान राहिले पाहिजे असे मत विदेशातून आलेले संजय नेमाडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी वरोरा शहरातील नामवंत ग्रुपचे ॲडमिन नरेंद्र नेमाने यांच्यासह दादा जयस्वाल, मनोज कोहळे, संजय नेमाडे, मनोज दारोकार, सुहास पामपट्टीवार, ज्ञानेश्वर माटे, अनिल पाटील, प्रशांत खुळे, गुल्हाने साहेब, स्वामीजी, आधी सदस्य उपस्थित होते.
Comments
Post a Comment