मराठी क्षेत्रातील निर्माता-दिग्दर्शक लेखक व गीतकार घनशाम येडे यांची आनंदवनला भेट

मराठी क्षेत्रातील निर्माता-दिग्दर्शक लेखक व गीतकार घनशाम येडे यांची आनंदवनला भेट
वरोरा 3/3/22
चेतन लूतडे

मराठी चित्रपटातील निर्माता-दिग्दर्शक लेखक व गीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले घनशाम येडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आनंदवनला भेट दिली. या भेटीनंतर त्यांनी आनंदवन चित्रपट सृष्टीसाठी आत्मा असून खरोखरच या क्षेत्रातील लोकांनी एकदा तरी स्वरानंद बघावाच अशी इच्छा व्यक्त केली.

बुधवारी सकाळी दोन मार्चला   मराठी चित्रपटातील निर्माता-दिग्दर्शक लेखक गीतकार व कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते घनशाम येडे ज्यांनी एलिझाबेथ एकादशी, नवनाथ, अशा बऱ्याच मराठी चित्रपटात अभिनय व लेखन केले असून मराठी चित्रपट सृष्टीत नवीन अभिनय करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.त्यामुळे आनंदवनला त्यांची भेट अशा कलाकारांसाठी पर्वणीय ठरली. त्यांचे राष्ट्रप्रेम व समाजीक भावनेतून नेहमी ते मराठी चित्रपटात नवीन विषय घेऊन चित्रपट बनवीत असतात.

आनंदवनमध्ये आल्या नंतर श्रद्धेय बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या स्मृतीला भेट देऊन विकास आमटे यांची भेट घेतली. यानंतर स्वरानंद ऑर्केस्ट्रा मधील कलाकारांना ते भेटले आनंदवन येथील महारोगी अंध-अपंग कलाकारांनी आपले गीत व नृत्य सादर केले. हे गीत आणि नृत्य पाहून निर्माता-दिग्दर्शक घनशाम येडे स्वतःलाच रंगमंचावर जाण्यासाठी थांबवू शकले नाही. स्वरानंद कलाकाराची चित्रफित तयार करू लागले ते यावेळी भावनिक झाले होते. प्रत्येक क्षणाची चित्रफीत तयार करून जीवनभर आठवणीत राहील असे शिक्षण आनंदवने दिल्याचे मत व्यक्त करत होते. अशा कलाकारांना माझ्या अल्बम मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून देईल व आनंदवन साठी चित्रपट सृष्टी मध्ये मिळालेला काही आर्थिक भाग आनंद वन साठी शिल्लक ठेवील असेही ते म्हणाले.आम्हाला हात पाय व्यवस्थित असून इतके चांगले नृत्य आम्ही सुद्धा करू शकत नाही अंध अपंग ज्यांना पाहता येत नाही अशी व्यक्ती सुरेल गाणे गात आहे. त्यामुळे आम्ही चित्रपट सृष्टीत काहीच कमावले नाही. चित्रपटसृष्टीत ज्यांनी कमावले असं वाटते त्यांनी एकदा आनंदवनला येऊन बघावेच अशी तीव्र इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. दिवसभर आनंदवन चा संपूर्ण फेरफटका मारत आनंदवनी  केलेल्या कामाची स्तुती ते करत होते. स्वरानंद सारखे अनेक अंग संधी निकेतन, अनाथालय, महारोगी दवाखाना, हस्तकला, अशा अनेक विभागाला त्यांनी भेटी दिल्या.

यावेळी वरोरा शहरातील डॉक्टर सागर वझे, मोहन रंगदळ, देविदास आंबेकर, अशोक गाढे, सतीश नाजर कर, सुनील गावडे, राजेश ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments