माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत शहरातील युवकांचा भाजपात प्रवेश*

*माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत शहरातील युवकांचा भाजपात प्रवेश*

वरोरा शहरातील यात्रा व बाजार वार्ड परिसरातील युवकांनी मोठ्या संख्येने २३मार्च बुधवारला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश  केला.

यावेळी हंसराज अहीर यांनी युवकांना प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देत कोणतीही मागणी न करता ज्या आनंदाने आपण भाजपात प्रवेश केला तो आनंद वाढेल.या पक्षात आपला मान सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली . 
     जाती पातीचा विचार न करता सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास या मूलमंत्राने काम करणारा भाजप हा पक्ष आहे.अश्या पक्षात आपले स्वागत आहे असे उद्गार यावेळी काढले. 
       दीपक चव्हाण यांच्या सोबत नासिर खान, अनिल सिंग, शशिकांत गुप्ता, निसर्गाने, आदर्श सोयाम,सागर चौधरी,बशीर पठान, रिजवान रंगरेज, आतिक पठान, रमेश पंधराम या प्रमुख युवकांच्या यात्रा व बाजार वार्ड परिसरातील  ७९ युवकांच्या गळ्यात मान्यवरांच्या हस्ते भाजपाचा दुपट्टा टाकत व गुलाब पुष्प देत पक्षात प्रवेश दिला. या युवकांनी हातात भाजपाचे झेंडे घेत जय घोष करीत विजयी घोषणा दिल्या. 
      या युवकांच्या प्रवेशामुळे   या भागातील भाजपाची स्थिती बळकट झाली असून येत्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल असे मत भाजपचे जिल्हा सचिव व माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी यावेळी नोंदविले.

      माजी मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आशिष देवतळे, प्रदेश युवा मोर्चाचे सचिव करण देवतळे,बाबासाहेब भागडे,ओम मांडवकर,विजय वानखेडे ,सुरेश महाजनआदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
       या कार्यक्रमाला देविदास ताजने,महेश श्रीरंग,आशिष रणदिवे,संजय राम,विलास गयनेवार,दिलीप घोरपडे,अक्षय भिवदरे, डॉ.गुणानंद दुर्गे,मोहन रंगदळ,ओम यादव,दिपक घुडे, रेखा समर्थ, ममता मरसकोल्हे,ज्योति किटे,छाया चौव्हाण आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       गजानन राऊत यांनी कार्यक्रमाचे संचलन तर विनोद लोहकरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments