शेतमजूराच्या खोट्या सहीने बँक कर्मचाऱ्याने केला अपहार केल्याचा आरोप

शेतमजूराच्या खोट्या सहीने बँक कर्मचाऱ्याने केला अपहार केल्याचा आरोप 

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील प्रकार : तक्रार परत घेण्यासाठी दबाव 

भद्रावती : मोलमजुरी करून आपला कष्टाचा पैसा बँकेत जमा केला.मात्र खोट्या स्वाशारी करून बँकेतील कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयावर ताव मारला.एक महिन्यानंतर खातेदार बँकेत असलेली रक्कम  काढण्यासाठी गेले असता हा सगळा प्रकार उघडीस आला. याबाबत खातेदाराने भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दिले आहे.मात्र तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचे तक्रारकर्ते यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.  
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावात विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा आहे. याठिकाणी बऱ्याच शेतकरी व शेतमजूर लोकांचे खाते आहे. गावातीलच रामचंद्र मारोती केदार यांचे १९८४ पासून बँकेत संयुक्त बचत खाते आहे. दुसऱ्याची मजुरी करून जगण्याचे एकमात्र त्याचं साधन. मोलमजुरी करून एक एक पैसा बँकेत जमा केला. ८२ हजार ३९८ रुपये बँकेत जमा होते. पैसाच काम पडल्याने ८ मार्च २०२२ ला ३० हजार रुपयाची उचल केली. मात्र रक्कम कमी पडत असल्याने उर्वरित ५० हजार रुपये दि. ९ मार्च ला काढण्यासाठी गेले असता खात्यात फक्त २ हजार ३८१ रुपये शिल्लक असल्याचे बँक कर्मचार्यानी त्यांना सांगितले.मोलमजुरी करून जमा केलेला पैसे गहाळ झाल्याने मोठा मानसिक धक्का बसला. बँक कर्मचारी सुद्धा समाधानकारक उत्तर दिले नाही. चौकशी केली असता सदर रक्कम  बँकेतील रोजंदारी कर्मचारी नंदकिशोर हनवते यानी बनावट स्वाक्षरी करून गणेश एलेक्ट्रीकॅल वरोरा यांच्या खात्यात ५० हजार रुपये वळते केले असल्याची माहिती मिळाली. मोलमजुरी करून जमा केलेला पैसा गहाळ झाल्याने खातेदार शेतमजुरास मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सदर प्रकरणाची तक्रार भद्रावती पोलीस ठाण्यात करण्यात आली. असे अनेक प्रकार बँकेत घडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड उघडीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाही करून न्याय देण्याची मागणी तक्रारदाराणे केली आहे.

हा प्रकार माहीत झाल्याने बँकेतील त्या कर्मचाऱ्याने लगेच 30000रू घेतलेल्या दुकानदाराकडून वापस केले. यानंतर उर्वरित 20 हजार रुपये देण्याचे कबूल केले. मात्र या सगळ्या प्रकरणात चंदनखेडा परिसरातील गरीब जनतेचे आलेले जनधन योजनेमार्फत किंवा शेत पिकाचे पैसे गहाळ झाल्याचा आरोप सुद्धा गावकरी करत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जाते.

 *प्रतिक्रिया देण्यास नकार* 
सदर प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी यांनी प्रताक्षदर्शी बँकेत जाऊन बँक व्यवस्थापक यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असता बँक व्यवस्थापक यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचा या प्रकरणात अप्रत्क्ष हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 *खातेदारांनी दिलेला माफिनामा बनावट* 
रामचंद केदार यांनी ती रक्कम नंदकिशोर हनवते यांना उधार म्हणून वापरण्यासाठी दिली होती. वयोमानाने मी विसरून गेलो. कुठलाही गैरप्रकार झाला नाही मला माझी रक्कम परत मिळाली त्यामुळे माझी कुठलीही तक्रार नाही मी बँकेला माफी मागतो असा माफीनामा बँकेत देण्यात आला. मात्र मी असा कुठ्लाच माफीनामा दिला नाही मी रक्कम उधारीवर दिली नाही माझ्यावर तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणला जात आहे अशी प्रतिक्रिया तक्रारदार केदार यांनी प्रतिनिधीला दिली.

Comments